Imran Khans Ex Wife Jemima Goldsmith Saam Tv
देश विदेश

Imran Khan: इम्रान खानची पत्नी रिलेशनशिपमध्ये, जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत बांधणार लग्नगाठ

Imran Khans Ex Wife Jemima Goldsmith: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खानची एक्स वाईफ रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

Priya More
  • जेमिमा गोल्डस्मिथ पुन्हा विवाहबंधनात अडकणार

  • इम्रान खान यांच्या माजी पत्नीचं नवं रिलेशनशिप

  • अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत जेमिमाचं लग्न

रोहित कदम, साम टीव्ही

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ पुन्हा विवाहबंधनात अडकणार आहेत. जेमिमा या एका अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनमध्ये आहेत. लवकरच दोघांचं लग्नही होणारंय. पाहूयात कोण आहे जेमिमा यांचा हा अब्जाधीश प्रियकर...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच कायम चर्चेत राहिले आहेत. क्रिकेटपटू असताना कॅप्टन, बॉलर आणि ऑलराऊंडर म्हणून त्यांनी गाजवलेली कारकीर्द आजही अनेकांच्या स्मरणात आहे. आता इम्रान यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय अर्थात त्यांच्या कारनाम्यामुळे नव्हे तर पत्नीच्या नव्या अफेअरमुळे. इम्रान खान यांची पहिली पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ लवकरच लग्नबंधनात अडकणारंय. जेमिमा गोल्डस्मिथ वयाच्या 52व्या वर्षी आता पुन्हा प्रेमात पडल्या असून, त्या लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. 62 वर्षीय अब्जाधीश गुंतवणूकदार कॅमेरॉन ओरायली यांच्यासोबत वर्षभराहून अधिक काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी आता लग्नाचा निर्णय घेतलाय.

डेली मेलच्या वृत्तानुसार दोघांचा साखरपुडाही झालाय. मागील एका वर्षापासून ते एकमेकांना डेट करत होते. सध्या हे जोडपं एकत्र राहतंय. कॅमेरॉन यांची जेमिमाशी ओळख त्यावेळी झाली, जेव्हा ते अनेक डॉक्युमेंटरी आणि चित्रपटांमध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम करत होते. दोघांची पहिली भेट कामाच्या निमित्तानं झाली होती. सुरुवातीला ते काही काळ मित्र होते आणि मागील वर्षभराहून अधिक काळापासून कपल म्हणून एकत्र राहात आहेत.

कॅमेरॉन ओरायली हे आयरिश-ऑस्ट्रेलियन फायनान्सर आहेत. ते प्रसिद्ध माध्यमसम्राट आणि आंतरराष्ट्रीय रग्बी स्टार अँथनी ओरायली यांचे पुत्र आहेत. ऑक्सफर्डमधून पदवी घेतलेल्या ओरायली यांनी जवळपास दशकभर वडिलांच्या ‘इंडिपेंडंट न्यूज ॲण्ड मीडिया’ या मीडिया हाउसमध्ये काम केलं. 2000 मध्ये त्यांनी सीईओपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर 2003 मध्ये त्यांनी ‘बेयार्ड कॅपिटल’ हा प्रायव्हेट इक्विटी फंड सुरू करून गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम सुरू केलं.

तर जेमिमा गोल्डस्मिथ या दिवंगत अब्जाधीश फायनान्सर जेम्स गोल्डस्मिथ यांच्या कन्या आहेत. इमरान खान आणि जेमिमा यांना कासिम आणि सुलेमान ही दोन मुलं आहेत. जेमिमा यांनी 1995 मध्ये इमरान खान यांच्याशी विवाह केला होता. हा संसार 9 वर्षं टिकला आणि 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. इम्रान खान 2023 पासून रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात आहेत. सत्तेत असताना भ्रष्टाचार केल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. इमरान आणि जेमिमा विभक्त झाले असले, तरी इमरान खान यांच्या सुटकेसाठी त्या मोहीम चालवत आहेत. आता सर्वांनाच प्रतीक्षा आहे ती जेमिमा आणि कॅमरॉन यांच्या लग्नाची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghabadkund Collection: मराठी चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर डंका; 'घबाडकुंड'चा दोन आठवड्यांत ८ कोटींपेक्षा जास्त गल्ला

Crime: १३ वर्षीय भाचीचं अपरहण, शेतात नेऊन मामाकडून बलात्कार; नंतर गळा दाबून संपवलं

Maharashtra News Live Update: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्याला दोन दिवस रेड अलर्ट

Lemon Coriander Soup: मान्सून स्पेशल रेसिपी! गरमागरम लेमन कोरिअँडर सूपने वाढवा जेवणाची मजा, नोट करा रेसिपी

माकपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकारणात शोककळा

SCROLL FOR NEXT