

Islamabad Attack : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वामध्ये एका पोलीस चौकीत हल्लेखोरांनी स्फोट घडवून आणल्यानंतर तुफान गोळीबार केला. या हल्ल्यात २१ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. डझनभर पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बंडखोरांनी आधी स्फोटकांनी भरलेली कार पोलीस ठाण्यात घुसवली आणि स्फोट घडवून आणला. त्यानंतर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांना सावरण्यास वेळ मिळाला नाही. इतकेच नाही तर, पोलिसांच्या जवळील शस्त्रे घेऊन हल्लेखोर पसार झाले.
इत्तेहाद-उल-मुजाहिद्दीन पाकिस्तान या संघटनेने पोलीस चौकीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेतली. हा हल्ला शनिवारी रात्री उशिरा खैबर पख्तुनख्वा येथील बन्नू जिल्ह्यात करण्यात आला. हा अफगाणिस्तान सीमेला लागून असलेला जिल्हा आहे. हल्ल्यानंतर शस्त्रधारी हल्लेखोर हे अफगाणिस्तानमध्ये पळून गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या जिल्ह्यातील काही भागांत बंडखोरांचं वर्चस्व आहे. या ठिकाणी पोलीस, सैन्य आणि निमलष्करी दलाच्या जवानांवर नेहमी अशा प्रकारचे हल्ले होत असतात.
बन्नू जिल्ह्याचे पोलीस अधिकारी जाहिद खान यांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, आत्मघाती हल्लेखोर आणि अन्य शस्त्रधारी व्यक्तींनी पोलीस चौकीजवळ स्फोटकांनी भरलेली कार आणली आणि ती स्फोटाने उडवून दिली. पोलीस चौकीत अनेक स्फोट झाले. स्फोट इतका शक्तीशाली होता की पोलीस चौकी ढासळली. अल जजिराच्या वृत्तानुसार, स्फोटकांनी भरलेली एक कार पोलीस चौकीत आणून स्फोट घडवून आणला. या स्फोटात पोलीस चौकी ढासळली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला. यात किमान २१ पोलीस कर्मचारी मारले गेले. तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.