Skin Care: नॅचरल सॉफ्ट स्किन पाहिजे? घरी तयार केलेलं हे फेस वॉटर वापरा; पिंपल्स, ऑपन पॉर्सचा त्रास होईल कमी

Shruti Vilas Kadam

घरी कसे बनवायचे?

एका वाटीत २ चमचे तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवा आणि थोड्या पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवा. दुसरीकडे २ लवंगा पाण्यात उकळून ते पाणी थंड करा. आता २ चमचे तांदळाचे पाणी, १ चमचा लवंगाचे पाणी आणि १ चमचा गुलाबपाणी एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.

Skin Care | Saam Tv

चेहऱ्याला मिळतो ताजेपणा

तांदळाचे पाणी आणि गुलाबपाणी चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेला थंडावा आणि ताजेपणा जाणवू शकतो. उन्हामुळे चेहरा थकलेला दिसत असेल तर हे मिश्रण वापरून पाहू शकता.

Skin Care

चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी जाणवतो

काही लोकांना चेहऱ्यावर जास्त तेल येण्याची समस्या असते. अशावेळी गुलाबपाण्याचा वापर केल्याने त्वचा स्वच्छ आणि फ्रेश वाटू शकते. मात्र, तेलकटपणा कमी होण्याचा परिणाम प्रत्येकाच्या त्वचेनुसार वेगळा असू शकतो.

Skin Care

त्वचा मऊ राहण्यास मदत

गुलाबपाण्यामुळे त्वचेला ताजेतवाने वाटते. तांदळाच्या पाण्यासोबत त्याचा वापर केल्यास चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी जाणवण्यास मदत होऊ शकते.

Skin Care

त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत होऊ शकते

तांदळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट घटक असतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी त्याचा वापर केला जातो. चेहऱ्यावरील डाग किंवा पिग्मेंटेशन कमी होतात.

Skin Care | Pintrest

लवंगाच्या पाण्यामुळे त्वचेची काळजी घेता येते

लवंगामध्ये अँटिऑक्सिडंट आणि युजेनॉल नावाचा घटक असतो. लवंगाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने मुरुमे किंवा पिंपल्स नक्कीच कमी होतात. संवेदनशील त्वचेला यामुळे जळजळ होऊ शकते.

Skin Care | Saam Tv

चेहऱ्याला मिळू शकतो फ्रेश लूक

तांदळाचे पाणी, गुलाबपाणी आणि लवंगाचे पाणी यांचा वापर केल्याने चेहऱ्याला ताजेतवाने वाटू शकते. या तिन्ही गोष्टी एकत्र केल्याने त्वचेचा ग्लो वाढतो.

Skin care | Saam tv

त्वचेची स्वच्छता राखण्यास मदत

तांदळाचे पाणी आणि गुलाबपाणी चेहऱ्याची स्वच्छता केल्यानंतर वापरता येते. यामुळे त्वचेला ताजेतवाने वाटते.

Skin Care | Saam Tv

Carrot Differnce: लाल गाजर की नारंगी गाजर? आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर; जाणून घ्या दोघांमधील ७ फरक

Red Carrot vs Orange Carrot | Saam Tv
येथे क्लिक करा