Carrot Differnce: लाल गाजर की नारंगी गाजर? आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर; जाणून घ्या दोघांमधील ७ फरक

Shruti Vilas Kadam

दोन्ही गाजरांच्या रंगात असतो फरक

लाल आणि ऑरेंज गाजराचा रंग वेगवेगळा असतो. लाल गाजराला लाल रंग लाइकोपीनमुळे मिळतो. तर ऑरेंज गाजराचा रंग बीटा-कॅरोटीनमुळे नारंगी दिसतो.

carrot | pinterest

डोळ्यांसाठी कोणते गाजर चांगले?

ऑरेंज गाजरात बीटा-कॅरोटीन असते. शरीराला या घटकापासून व्हिटॅमिन ए मिळते. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

carrot | pinterest

हृदयासाठी लाल गाजर फायदेशीर

लाल गाजरात लाइकोपीन नावाचा घटक असतो. हा घटक शरीराचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यास मदत करतो. त्यामुळे लाल गाजर खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.

carrot

दोन्हीमध्ये असतात पोषक घटक

लाल आणि ऑरेंज गाजर या दोन्हीमध्ये शरीरासाठी आवश्यक पोषक घटक असतात. लाल गाजरात लाइकोपीन तर ऑरेंज गाजरात बीटा-कॅरोटीन जास्त प्रमाणात आढळते.

Carrot | yandex

चवीमध्ये असतो फरक

लाल गाजर चवीला गोड आणि रसाळ असते. तर ऑरेंज गाजर थोडे कुरकुरीत आणि गोडसर असते. दोन्ही गाजरांचा वापर सॅलड आणि ज्यूस बनवण्यासाठी करता येतो.

carrot

शरीरासाठी दोन्ही गाजरे चांगली

लाल आणि ऑरेंज गाजर या दोन्हीमध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. ऑरेंज गाजरातून बीटा-कॅरोटीन मिळते, तर लाल गाजरातून लाइकोपीन मिळते. त्यामुळे दोन्ही गाजरे खाणे फायदेशीर आहे.

Carrot | GOOGLE

कोणते गाजर खावे?

लाल आणि ऑरेंज गाजर या दोन्हींचे वेगवेगळे फायदे आहेत. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ऑरेंज गाजर चांगले, तर लाइकोपीनसाठी लाल गाजर फायदेशीर आहे. त्यामुळे आहारात दोन्ही गाजरांचा समावेश करा.

Carrot

Morning Phone Checking: सकाळी डोळे उघडताच मोबाईल चेक करता? मेंदूवर होऊ शकतो परिणाम; आजच बदला ही सवय!

Morning Phone Checking | Saam Tv
येथे क्लिक करा