Morning Phone Checking: सकाळी डोळे उघडताच मोबाईल चेक करता? मेंदूवर होऊ शकतो परिणाम; आजच बदला ही सवय!

Shruti Vilas Kadam

मेंदूवर वाढतो ताण

सकाळी झोपेतून उठल्यानंतर लगेच मोबाईल पाहिल्यामुळे मेंदूला अनेक गोष्टींची माहिती एकाच वेळी मिळते. मेसेज, बातम्या आणि नोटिफिकेशन्स पाहिल्यामुळे मेंदूवर ताण येऊ शकतो.

Using Mobile Phones In Bed | Saam Tv

डोपामाइनवर होतो परिणाम

मोबाईलवर सतत नवीन मेसेज, व्हिडीओ आणि नोटिफिकेशन्स पाहण्याची सवय लागते. त्यामुळे वारंवार मोबाईल पाहण्याची इच्छा होऊ शकते.

Using Mobile Phones In Bed | canva

मनात निर्माण होते अस्वस्थता

सकाळी उठताच ऑफिसचे मेसेज किंवा कामाचे ई-मेल पाहिल्यामुळे कामाची चिंता सुरू होते. त्यामुळे दिवसाची सुरुवात तणावात होऊ शकते.

Using Mobile Phones In Bed | canva

मुलांच्या एकाग्रतेवर होतो परिणाम

लहान मुले सकाळी उठताच मोबाईल पाहत असतील, तर त्यांचे अभ्यासात लक्ष लागणे कठीण होऊ शकते. तसेच मोबाईलमुळे खेळणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे कमी होऊ शकते.

Mobile Phone | canva

नकारात्मक विचार वाढू शकतात

सकाळी उठल्याबरोबर बातम्या किंवा सोशल मीडिया पाहिल्यामुळे अनेकदा वाईट बातम्या समोर येतात. त्यामुळे मनात भीती, चिंता आणि नकारात्मक विचार येऊ शकतात.

Mobile Phone Use | Canva

शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम

सकाळी आपले शरीर झोपेतून जागे होण्यासाठी तयार होत असते. अशावेळी सतत तणाव देणाऱ्या गोष्टी मोबाईलवर पाहिल्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकते.

Mobile Phone Use

कामात लक्ष लागत नाही

सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे दिवसातील महत्त्वाची कामे करण्यास उशीर होतो. तसेच काम करताना वारंवार मोबाईल पाहण्याची सवय लागू शकते.

Mobile Phone Use

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Using Mobile Phones In Bed | canva

Maheshwari Saree Designs: लग्नसमारंभ आणि सणांसाठी ट्राय करा महेश्वरी साडीचे ७ सुंदर आणि रॉयल डिझाइन्स!

Maheshwari Saree Designs | Saam Tv
येथे क्लिक करा