मानवानं चंद्रावर पाऊल ठेवून तब्बल 50 वर्षे उलटून गेलीयेत. मात्र, मानवाचं चंद्रावरील पृृष्ठभागाबाबतच गूढ काही कमी झालेलं दिसत नाहीये. त्यानंतर जागतिक महासत्तांमध्ये चंद्रावर नवनवीन प्रयोग करण्याची जणू चढाओढच लागलीये. त्यातच आता चीननं अमेरिकेच्या एक पाऊल पुढे टाकत भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजना समोर आलीये. आगामी काळात चंद्रावर उत्खनन करून खनिज संपत्ती शोधण्याच्या दृष्टीनं चीननं कशा हालचाली सुरू केल्यात ते पाहूयात...
चीनने 2050 पर्यंत चंद्रावर मोठ्या प्रमाणावर खाणकाम सुरू करण्याचा आराखडा सादर केलाय
'चांग-ए' मोहिमेंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावरील बर्फ आणि ऑक्सिजन वेगळं करण्याच्या तंत्रज्ञानावर काम करणार
2030 पर्यंत पाणी आणि ऑक्सिजन उत्पादन तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जाणार आहे
तर 2040 पर्यंत एक प्रात्यक्षिक प्रकल्प उभारला जाणार आहे
'जर्नल ऑफ डीप स्पेस एक्सप्लोरेशन'मध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधात भौतिकशास्त्रज्ञांनी या मोहिमेबाबत खुलासा केलाय. मात्र, याआधी चीननं चंद्रावर अनेक यशस्वी मोहिमा केल्यात...
चीनकडून चंद्रावर मोहिमांचा धडाका
चांग-1 मोहीम
चंद्राच्या कक्षेतून निरीक्षण आणि पृष्ठभागाचे मॅपिंग करण्यासाठी मोहीम
चांग-3 मोहीम
चंद्रावर यान आणि रोव्हर लँडिंग करण्यात चीन यशस्वी
चांग-4 मोहीम
चंद्राच्या मागच्या भागात लँडिंग करणारा चीन जगातील पहिला देश
चांग-5-T1 मोहीम
चंद्राच्या पृष्ठभागावरून 1,731 ग्रॅम माती आणि खडकांचे नमुने घेऊन यान पृथ्वीवर परतले
चाँगई-6 मोहीम
चंद्राच्या मागच्या भागातून नमुने गोळा करून पृथ्वीवर आणणारा चीन पहिला देश ठरला
महत्त्वाचं म्हणजे, चीननं चंद्रावर उतरवण्याच्या मोहिमेबाबत आधीपासून तयारी सुरू केलीये. चीनने केवळ यशस्वी प्रयोगच केले नाहीत, तर त्याच्या विकासातही लक्षणीय प्रगती केलीये. त्यामुळे जागतिक महासत्तांची नजर पृथ्वीबाहेर थेट चंद्रावरील खनिज संपत्तीवर पडल्याचं दिसतंय. त्यामुळे चीननं नव्या मोहिमेचे संकेत दिल्यानं अंतराळ क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.