प्रवासात किंवा कार्यक्रमात तुम्ही जर बिसलेरीचं पाणी पित असाल सावध व्हा... कारण, हे पाणी तुमच्यासाठी जीवघेण्या आजाराला निमंत्रण देणारं ठरू शकतं. कारण, FSSAI नं बिसलेरीच्या प्रकल्पातून घेतलेल्या 'पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर'च्या नमुन्याची तपासणी केलीये. या तपासणीनंतर बिसलेरीच्या पाण्यात कॅन्सरला निमंत्रण देणारे घटक आढळून आल्याचं FSSAI च्या तपाणीत आढळून आलंय. FSSAI च्या अहवालात नेमकं काय आहे ते पाहूयात...
- दोनदा केलेल्या चाचणीत बिसलेरीचं पाणी पिण्यास अयोग्य आणि असुरक्षित असल्याचं आढलून आलं.
- पहिल्या तपासणीत आरोग्याला धोकादायक असलेल्या ब्रोमेटचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळलं
- बिसलेरी कंपनीच्या आक्षेपानंतर केलेल्या दुसऱ्या चाचणीत पाण्यात PAHs हे कॅन्सरला कारणीभूत ठरणारे घटक आढळले
- टेस्टिंगसाठी पाण्याचे नमुने बाजारातून नाही तर थेट बिसलेरी कंपनीच्या ुप्रकल्पातून तपासणीसाठी घेतल्याची माहिती
- देशातील सर्वात मोठी बाटलीबंद पाण्याची कंपनी बिसलेरीवर FSSAIकडून कोर्टात खटला चालवण्यास मंजुरी
FSSAIच्या नोटीशीसंदर्भातल्या बातम्यानंतर बिसलेरीनं स्पष्टीकरण दिलंय...
बिसलेरी कंपनीचं स्पष्टीकरण
FSSAI कडून गोव्यातील कंपनीच्या उत्पादन केंद्रातून पाण्याच्या 6 नमुन्यांची तपासणी
5 नमुने गुणवत्ता तपासणीच्या सर्व निकषांवर योग्य ठरले
6 व्या नमुन्याच्या प्राथमिक तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण प्रति लिटर 12 मायक्रोग्रॅम आढळलं
कंपनीचे बाटलीबंद पाणी पिण्यासाठी सुरक्षित
खरंतर, बाटलीबंद पाण्याचा वापर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढलाय. विशेष म्हणजे हे शुद्ध असल्याचं गृहीत धरून आपण बिनधास्त पित असतो. मात्र प्लास्टिकच्या बाटलीबंद पाण्याचे घातक परिणाम मानवी शरीरावर होत असल्याचं अनेकदा समोर आलंय. आता FSSAI च्या नोटीशीमुळे सर्वत्र खळबळ उडालीये. त्यामुळे बाटलीबंद पाणी पिताना खबरदारी घ्या आणि आरोग्याची काळजी घ्या...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.