

pakistan market blast kills eight in khyber pakhtunkhwa : पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ले आणि स्फोटांची मालिका सुरूच आहे. उत्तर-पश्चिमेकडील खैबर पख्तुनख्वामध्ये मंगळवारी मोठा आत्मघाती हल्ला झाला. यात किमान आठ जणांचा मृत्यू झाला. तर ३५ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन वाहतूक पोलीस कर्मचारी आणि एका महिलेचाही समावेश आहे. भरबाजारात झालेल्या स्फोटानंतर परिसरात गोंधळ उडाला. सुरक्षा यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचली.
लक्की मारवात जिल्ह्याच्या नौरंग बाजारातील फाटक चौकात हा आत्मघाती हल्ला झाला. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी स्फोटकांनी भरलेली ऑटो रिक्षा उडवून दिली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की आजूबाजूचा संपूर्ण परिसर हादरला. अनेक दुकाने आणि वाहनांचे यात नुकसान झाले. पीटीआयच्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर बाजाराच्या परिसरात तात्काळ बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथक आणि रुग्णावाहिका तात्काळ पोहोचल्या. जखमींना लगेच रुग्णालयात नेण्यात आले.
टीएसक्यू हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक मोहम्मद इशाक यांनी वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आतापर्यंत ३७ जखमी दाखल झाले आहेत. यातील काही जखमींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. दरम्यान, स्फोटानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला आहे. बचावकार्य सुरू आहे. त्यासाठी एक पथक कार्यरत आहे. तर सुरक्षा यंत्रणांकडून घटनास्थळाची तपासणी करण्यात येत आहे. या हल्ल्याच्या घटनेनं प्रांतातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
खैबर पख्तुनख्वातील बाजारात हा स्फोट झाला. त्याच्या आधी शनिवारीच बन्नू जिल्ह्यातही स्फोट झाला होता. एका पोलीस चौकीजवळ स्फोटानं भरलेली कार नेऊन ती स्फोटानं उडवून देण्यात आली. यानंतर बंदुकधारी हल्लेखोरांनी पोलीस चौकीतील पोलीस कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यात १५ ते २० पोलीस कर्मचारी ठार झाले होते. या हल्ल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानवर आरोप केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.