गोरं होण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी अनेकांची ध़डपड असते. त्यासाठी नाना क्रिमचा वापर तरुण-तरूणी करत असतात. मात्र तुमचाही असा प्रयत्न असेल तर सावध व्हा...कारण गोरेपणाची आणि नितळ त्वचा देण्याची हमी देणारी क्रीम तुमच्या आरोग्याला गंभीर इजा पोहचू शकते. आम्ही असं का म्हणतोय ? त्याला कारण आहे लोकप्रिय मल्ल्याळम गायक आणि संगीतकार सलीम कोडाथूर यांनी शेअर केलेला त्यांचा धक्कादायक अनुभव....१० वर्षांपूर्वी एका मित्राच्या सल्ल्यावरून फेअरनेस क्रीम वापरल्यामुळे त्यांंना कोणत्या समस्येला सामोरं जाव लागलं ते पाहूया...
सलीम यांनी सांगितलं की, 'त्यांनी ही क्रीम 500 रुपयांना विकत घेतली होती. एका वर्षापेक्षा जास्त काळ तिचा वापर केला. फेअरनेस क्रीम वापरल्यामुळे गंभीर युरिनरी इन्फेक्शन झालं. यानंतर काहीच महिन्यांत पापण्यांवर आणि पायांवर सूज आली. तसेच इम्युनिटी देखील कमी झाली. किडनीच्या बायोप्सीनंतर 'मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी' हा आजार झाल्याचं निदान झालं. उपचारासाठी अनेक महिने रुग्णालयात दाखल करावं लागलं. आरोग्याच्या समस्या अजूनही त्रास देत आहेत. विशेषतः झोपेच्या तक्रारी. मी दिवसातून फक्त दोन-तीन तासच झोपू शकतो. काही वेळा तर मला झोप येण्यासाठी औषध घ्यावं लागतं' असं सलीम यांनी म्हटलं आहे.
असाच गंभीर आजार केरळमधील मलप्पुरम येथील १७ वर्षांच्या एका मुलीलाही झाला होता. फेअरनेस क्रीम वापरल्याने तिचा रक्तदाब कमी झाला. इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर्सचे प्रमोशनल व्हिडीओ पाहून तिने क्रीम मागवली होती. The Hindu वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, त्या क्रीमच्या चाचणीत पाऱ्याचे प्रमाण तब्बल 12,500 ppm इतके आढळले. जे कायदेशीर मर्यादेपेक्षा म्हणजेच 1 ppm पेक्षा बारा हजार पटीने अधिक आहे. या मुलीची बातमी समोर आल्यानंतर सलीम यांनी जनजागृतीसाठी आपला अनुभव शेअर केला. डॉक्टरांनीही अशा क्रीमचे धोके स्पष्ट करत सावध राहण्याचं आवाहन केलंय.
गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्रतही अशा प्रकारच्या बोगस ब्युटी क्रीमची विक्री होत होती. नांदेडमध्ये नुकताच पाकिस्तान मेड सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त केला होता. त्यातही पाऱ्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा 48 हजार पटीने जास्त आढळलंय. त्यामुळे गोरे होण्याची मनिषा जरुर बाळगा मात्र सौंदर्य प्रसाधने वापरताना खबरदारी घ्या. नाहीतर तुमच्याही किडनीला धोका निर्माण झालाच म्हणून समजा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.