Pakistan Terror Attack Social Media file Photo
देश विदेश

Pakistan Terror Attack : पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला, २३ सैनिक ठार, स्फोटकांनी भरलेला ट्रक सुरक्षा चौकीत घुसवला

Terror Attack : पाकिस्तानात आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात किमान २३ सैनिक ठार झाले. पाकिस्तानातील 'डॉन'च्या वृत्तानुसार, स्फोटाची तीव्रता इतकी होती की, पोलीस ठाण्याची इमारत जमिनदोस्त झाली. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.

Bharat Jadhav

Pakistan Terrorist Attack :

पाकिस्तानमध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २३ सैनिक ठार झाल्याची माहिती आहे. वृत्तानुसार, पाकिस्तानी तालिबान्यांनी हा हल्ला घडवून आणला. स्फोटकांनी भरलेला ट्रक खैबर-पख्तुनवातील डेरा इस्माइल खान जिल्ह्यातील सुरक्षा दलाच्या चौकीत घुसवला.(Latest News)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेरा इस्माइल खान जिल्ह्याच्या सीमेवरील सुरक्षा दलाच्या चौकीकडे अंदाजे सहा आत्मघाती हल्लेखोर चालून आले. स्फोटकांनी भरलेला ट्रक त्यांनी इमारतीच्या आत घुसवला आणि स्फोटकांनी उडवून दिला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाकिस्तानातील 'डॉन'च्या वृत्तानुसार, स्फोटाची तीव्रता इतकी होती की, पोलीस ठाण्याची इमारत जमिनदोस्त झाली. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. ज्या इमारतीवर हा आत्मघाती हल्ला झाला, ती इमारत पाकिस्तानी लष्कराचा बेस कॅम्प असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानी तालिबानी संघटनेशी संबंधित असलेल्या तेहरीक-ए-जिहाद पाकिस्तान (TJP) या दहशतवादी संघटनेचा आत्मघाती हल्ल्यामागे हात असल्याचे वृत्त आहे. संघटनेचा प्रवक्ता मुल्लाह कासिम याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, हे आमचं 'मिशन' आहे, असे तो म्हणाला.

या हल्ल्यात सर्व हल्लेखोर दहशतावादी मारले गेले आहेत. दुसरीकडे या घटनेनंतर सर्वत्र शोधमोहीम सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले. हल्ल्यानंतर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांसाठी 'इमर्जन्सी' घोषित करण्यात आली आहे. तर सर्व शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

Maharashtra Weather : थंडीची चाहुल लागताच 'या' जिल्ह्यांवर पावसाचं सावट, हवामानाचा आजचा अंदाज काय?

Sharad Pawar: 'गद्दार गणोजीला सुट्टी नाही'; मुंडे-भुजबळांनतर शरद पवार यांचा दिलीप वळसेंवर प्रहार

SCROLL FOR NEXT