Jammu Kashmir News: कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन जवान शहीद

Encounter in Kulgam: जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलाची लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले.
jammu and kashmir News encounter between terrorists and security forces three jawans succumbed
jammu and kashmir News encounter between terrorists and security forces three jawans succumbed Saam TV

Jammu Kashmir Kulgam Encounter News: जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलाची लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे. परिसराला घेराव घालून शोधमोहीम राबवली जात आहे.

येथे दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. शुक्रवारी, कुलगामच्या हलान जंगल परिसरात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी घेराव आणखी घट्ट होत असल्याचे पाहून सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला.

jammu and kashmir News encounter between terrorists and security forces three jawans succumbed
Rahul Gandhi PC : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

या गोळीबारात सुरक्षा दलाचे तीन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना तिन्ही जवानांचा मृत्यू झाला. हेड कॉन्स्टेबल बाबूलाल, कॉन्स्टेबल वसीम अहमद आणि सचिन असं शहीद झालेल्या जवानांची नावे असल्याची प्राथामिक माहिती आहे.

मात्र, लष्कराने जवानांची नावे जाहीर केलेली नाहीत. संवाद लष्कराने जवानांची नावे जाहीर केलेली नाहीत. दरम्यान, कुलग्राम जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी पळून जाऊ नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

दुसरीकडे, श्रीनगरमध्ये फिरत असलेल्या लष्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेल्या TRF (द रेझिस्टन्स फ्रंट) च्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून तीन हातबॉम्ब, 10 पिस्तुल काडतुसे, 25 एके-47 काडतुसे आणि इतर आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.

गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हर्नबल नातीपोरा येथे टीआरएफशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक केली. इम्रान अहमद नजर रा. बमुला, वसीम अहमद मट्टा रा. श्रीनगर आणि वकील अहमद भट रा. बिजबिहाडा अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. यातील वकील हा सक्रिय दहशतवादी होता. नुकताच तो जामिनावर बाहेर आला होता.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com