राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांची आज (३ डिसेंबर)मतमोजणी सुरु आहे. या राज्यातील निवडणूक निकालाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. ४ पैकी ३ राज्यांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान काँग्रेस पिछाडीवर असताना विरोधक टोमणे मारताना दिसून येत आहेत. दरम्यान पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने देखील एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत टोमणा मारला आहे. त्याने कुणाचही नाव न घेता,'कोण आहे पनवती?' असं लिहिलंय.
वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये 'पनवती' या शब्दावरुन राजकारण पेटलं होतं. आज काँग्रेसचा पराभव होत असताना भाजपच्या समर्थकांनी पोस्ट शेअर करत आता सांगा पनवती कोण? असं विचारायला सुरुवात केली आहे. (Latest sports updates)
हाती आलेल्या निकालानुसार, भाजपने १६० जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने ६७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर राजस्थानबद्दल बोलायचं झालं तर, भाजपने १०९ जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ७४ आणि इतर पक्ष १६ जागांवर आघाडीवर आहे.
तर ९० विधानसभा जागा असलेल्या छत्तीसगड राज्यात भाजप ५५ जागी आघाडीवर आहे. तर काँग्रेस ३३ आणि इतर पक्ष २ जागी आघाडीवर आहे. तेलंगणात काँग्रेस आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसने ६५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर बीआरएसने ४२ जागांवर तर बीजेपीने ९ जागांवर आघाडी घेतली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.