Breaking News: राज्यात NIA ची मोठी कारवाई! १० दहशतवादी ताब्यात; चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Latest News: आज (शनिवार, ९ डिसेंबर) एनआयएने राज्यातील विविध शहरांमध्ये पहाटेपासून मोठ्या कारवाया केल्या असून १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. ठाण्याजवळील पडगा,पुणे आणि इतर ठिकाणी एनआयए आणि एटीएसची छापेमारी सुरू आहे.
NIA News
NIA NewsSaam tv
Published On

Pune Breaking News:

राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने राज्यात मोठी कारवाई केली आहे. आज (शनिवार, ९ डिसेंबर) सकाळपासून एनआयए एकूण 44 ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारी दरम्यान १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. ठाण्याजवळील पडगा,पुणे आणि इतर ठिकाणी एनआयए आणि एटीएसची छापेमारी सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी( ९ डिसेंबर) राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यात संयुक्तपणे कारवाई करत १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. आज पहाटेपासून ही कारवाई सुरू होती. गुप्तचर विभागाकडून कर्नाटकातील १, पुण्यात २, ठाणे ग्रामीणमध्ये ३१, ठाणे शहरात ९ आणि भाईंदरमध्ये १ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

या कारवाईत भिवंडीच्या पडघा (Bhivandi) गावातून एनआयएने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने ७ ते ८ लोकांना ताब्यात घेतले आहे. पुण्यामधून दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गाव हे एनआयएच्या रडारवर होतं. तसेच पुणे आणि इतर ठिकाणीही सुरक्षा यंत्रणांची छापेमारी सुरू आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

NIA News
Raigad Crime News: रायगड जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई, अमलीपदार्थांचा कारखाना उदध्वस्त, १०० कोटींचा साठा जप्त

धक्कादायक बाब म्हणजे पकडलेले दहशतवादी देशभरात अनेक ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहितीही समोर आली आहे. त्यांच्याकडून बॉम्ब बाल्स्टचे साहित्यही राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने जप्त केले आहे.

दरम्यान, याआधी पुण्यात सापडलेल्या दहशतवादी प्रकरणानंतर पडघा गावातून दोन ते तीन जणांना करण्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

NIA News
Shiv Sena MLA Disqualification: ''शिंदेंविरोधातील त्या ठरावावर माझी सही नाही...'', सुनावणीत आज काय घडलं?, जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com