Pune Metro News: पुणेकरांचं 'मेट्रो' प्रेम संपलं? प्रवाशांनी फिरवली पाठ; उत्पन्नातही मोठी घसरण

Pune Metro News: पुण्यात सध्या सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल या दोन मार्गांवर मेट्रो धावतात. तसेच शिवाजी नगर ते हिंजवडी या मार्गावरही लवकरच पुणे मेट्रो धावताना दिसणार आहे.
pune Metro News:
pune Metro News:Saam TV
Published On

अक्षय बडवे, पुणे |ता. ८ डिसेंबर २०२३

Pune Metro News:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्ट रोजी पुणे मेट्रोचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. पुण्यात सध्या सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल या दोन मार्गांवर मेट्रो धावतात.

तसेच शिवाजी नगर ते हिंजवडी या मार्गावरही लवकरच पुणे मेट्रो धावताना दिसणार आहे. मेट्रोच्या उद्घाटनानंतर पुणेकरांनी त्याला जोरदार प्रतिसादही दिला. मात्र आता पुणेकरांचं मेट्रो प्रेम संपले की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

एकीकडे पुण्यामध्ये मेट्रोचे काम जलद गतीने सुरू असताना पुणेकरांनी मात्र मेट्रोने प्रवास करण्यास नापसंती दर्शवल्याचे दिसत आहे. पुणे मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आणि उत्पन्न दोन्हीही घटल्याची आकडेवारी समोर आली आहे. सध्या शहरात वनाझ ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय अशा दोन मार्गांवर मेट्रो धावतात.

यामधून नोव्हेंबर महिन्यात १४ लाख पुणेकरांनी प्रवास (Pune Metro) केला आहे. ज्यामधून २ कोटी २० लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. ऑगस्ट महिन्यापेक्षा मेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या तब्बल सहा लाखांनी घटली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

pune Metro News:
Sanjay Raut News: 'नैतिकतेचे बुडबुडे, ढोंग अन् सोंग...' नवाब मलिकांवरुन राजकारण तापलं; संजय राऊत भाजपवर बरसले

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये २० लाखांवर असलेली प्रवासी संख्या ऑक्टोबरमध्ये १६ लाख ७२ हजारांवर आली. तसेच उत्पन्नही २ कोटी ४८ लाखांवर आले आहे. मेट्रोमधून प्रवाशांची कमी होणारी संख्या वाढविण्याचे मोठे आव्हान आता मेट्रो प्रशासनासमोर आहे.

३ महिन्यात पुणे मेट्रो ची प्रवासी संख्या आणि उत्पन्न:

सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण २० लाख २३ हजार प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केला ज्यामधून २ कोटी ९८ लाख इतके उत्पन्न मिळाले. ऑक्टोबर महिन्यामध्ये एकूण १६ लाख ७२ हजार प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केला ज्यामधून २ कोटी ४८ लाखांचे उत्पन्न मिळाले. तर नोव्हेंबरमध्ये प्रवासी संख्या १४ लाख १८ हजार आणि २ कोटी २० लाखांचे उत्पन्न मिळाले. (Latest Marathi News)

pune Metro News:
Pune Cyber Fraud: पुण्यातील ऑनलाइन पेमेंट कंपनीला घातला ३.५ कोटींचा गंडा; २ सायबर चोरट्यांना पश्चिम बंगालमधून अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com