Private Companies Closed Saam Tv
देश विदेश

Private Companies: ५ वर्षांत २ लाखांपेक्षा जास्त कंपन्या बंद, धक्कादायक आकडेवारी आली समोर; नेमकं कारण काय?

Private Companies Closed In India: गेल्या ५ वर्षामध्ये देशभरातील तब्बल २ लाखांपेक्षा जास्त कंपन्या बंद झाल्या असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. केंद्र सरकारकडूनच ही माहिती लोकसभेत सादर करण्यात आली होती.

Priya More

Summary -

  • भारतातील कार्पोरेट सेक्टरमधून धक्कादायक माहिती समोर

  • गेल्या ५ वर्षांत भारतातील २ लाखांहून अधिक प्रायव्हेट कंपन्या बंद

  • २०२२-२३ मध्ये सर्वाधिक ८३ हजारांपेक्षा जास्त कंपन्यां बंद झाल्या

  • विलीनीकरण, रूपांतरण, निष्क्रियता आणि स्वेच्छेने बंद करणे ही प्रमुख कारणे आहेत

  • सरकारने १.८५ लाख निष्क्रिय कंपन्या अधिकृत नोंदींमधून काढून टाकल्या

भारतीय कार्पोरेट जगतातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या ५ वर्षांत देशातील २ लाखांपेक्षा जास्त प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्या. ही आकडेवारी फक्त मार्केटमधील चढ-उतार दर्शवत नाही तर शेल कंपन्या किंवा निष्क्रिय संस्थांवरील सरकारच्या कारवाईकडे देखील निर्देश करते. सोमवारी संसंदेत हा मुद्दा खूप चर्चेत राहिला. सरकारने लोकसभेत गेल्या ५ वर्षांत किती कंपन्या बंद झाल्या याची धक्कादायक आकडेवारी जारी केली होती.

सरकारने लोकसभेमध्ये सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारतात एकूण १५,२१६ प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्या. २०२१-२२ मध्ये ६४,०५४ प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्या. २०२२-२३ मध्ये सर्वाधिक ८३,४५२ खासगी कंपन्या बंद पडल्या. त्यानंतर २०२३-२४ मध्ये एकूण २१,१८१ कंपन्या बंद पडल्या. तर २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशभरात एकूण २०,३६५ कंपन्या बंद पडल्या. या सर्व आकडेवारीनुसार २०२०-२१ ते २०२४-२५ पर्यंत म्हणजे या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये एकूण २,०४,२६८ प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्या आहेत.

राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा ​​यांनी लोकसभेमध्ये सांगितले होते की, कंपनी कायदा २०१३ अंतर्गत गेल्या पाच वर्षांत एकूण २०४,२६८ प्रायव्हेट कंपन्या बंद पडल्या आहेत. या कंपन्या विलीनीकरण आणि रूपांतरण यासारख्या कारणांमुळे बंद पडल्या. याशिवाय, काही कंपन्या व्यवसाय करण्यास तयार नसल्यामुळे बंद पडल्या आहेत. तर काही कंपन्या दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्यामुळे बंद पडल्या.

२०२१-२२ पासून सुरू होणाऱ्या ५ आर्थिक वर्षांत कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने १,८५,३५० कंपन्यांना अधिकृत नोंदींमधून काढून टाकले आहे. चालू आर्थिक वर्षात १६ जुलै २०२५ पर्यंत ८,६४८ कंपन्यांनाही नोंदींमधून काढून टाकण्यात आले आहे. जर कंपन्यांनी दीर्घकाळ कामकाज थांबवले असेल किंवा नियामक आवश्यकता पूर्ण केल्यानंतर स्वेच्छेने माघार घ्यायची असेल तर त्यांना रेकॉर्डमधून काढून टाकता येते. ज्या कंपन्यांना गेल्या ५ वर्षांत बंद पडल्या त्यामधील अनेक कंपन्या या विलीनीकरण, रूपांतरण, स्वच्छेने बंद होणे आणि नियमांनुसार निष्क्रियतेच्या कालावधीमुळे रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आले.

कोणत्या वर्षी किती कंपन्या बंद झाल्या त्याची आकडेवारी -

२०२४-२५ - २०,३६५ कंपन्या

२०२३-२४ - २१,१८१ कंपन्या

२०२२-२३ - ८३,४५२ कंपन्या

२०२१-२२ - ६४,०५४ कंपन्या

२०२०-२१ - १५,२१६ कंपन्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व हरपले- अजित पवार

Jay Pawar Wedding: अजितदादांच्या घरी लगीनघाई! लेक जय पवारांचं लग्न परदेशात होणार; कसा असणार विवाहसोहळा? पत्रिका पाहा

Rapper Death: प्रसिद्ध रॅपरचे निधन, वयाच्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, संगीत विश्वात शोककळा

Gautam gambhir: गौतम गंभीरच्या कोचिंगचा मुद्दा पोहोचला सुप्रीम कोर्टात; टेस्ट सिरीजमध्ये झालेल्या पराभवावर जजने दिलेलं रिएक्शन VIRAL

Gold Price Today: सोन्याला पुन्हा झळाळी! १० तोळे सोनं ७१०० रुपयांनी महागलं, आजचे २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

SCROLL FOR NEXT