Kalyan Fraud Company : 'टोरेस' नंतर 'या' कंपनीने घातला गरजूंना लाखोंचा गंडा; नेमकं काय प्रकरण ?

Kalyan Jew Pedia Company Fraud : कल्याणमध्ये "ज्यू पीडिया" नावाच्या कथित कंपनीने ऑनलाईन टास्कच्या आमिषाने शेकडो गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक केली. सीईओ सुषमा पालकर व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kalyan Fraud Company : 'टोरेस' नंतर 'या' कंपनीने घातला गरजूंना लाखोंचा गंडा; नेमकं काय प्रकरण ?
Kalyan NewsSaam Tv
Published On
Summary
  • कल्याणमध्ये "ज्यू पीडिया" कंपनीने गुंतवणूकदारांची फसवणूक केली.

  • ऑनलाईन टास्क आणि नफ्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालण्यात आला.

  • सीईओ सुषमा पालकरसह तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

  • 'टोरेस' घोटाळ्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात मोठा घोटाळा उघडकीस.

दादरमधील 'टोरेस' या कंपनीची गंडा घालण्याची बातमी ताजी असतानाच कल्याणमध्ये धक्कदायक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याण शहरात 'ज्यू पीडिया' नावाने स्थापन झालेल्या कथित कंपनीने शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या कंपनीने आकर्षक मोबदला आणि मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून गरजू लोकांना आपल्या जाळ्यात ओढले. ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास प्रचंड कमाई होईल, असे खोटे आश्वासन देत लोकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेतली गेली.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये 'ज्यू पीडिया' नावाची एक कंपनी गरजू लोकांना आकर्षक मोबदला आणि मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत होती. या कंपनीची मुख्य सूत्रधार व कथित सीईओ सुषमा पालकर नावाची महिला होती. तिच्यासोबत लिली आणि जॅक नावाचे दोन व्यक्ती कंपनीच्या ऑनलाईन ग्रुपवर सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच वैयक्तिक संपर्क साधून लोकांना विविध पद्धतीचे टास्क ऑफर केले. हे टास्क पूर्ण केल्यावर मोबदला मिळेल आणि नऊ पायऱ्या पूर्ण केल्यावर लाखो रुपयांचा फायदा मिळेल, असे सांगण्यात आले.

Kalyan Fraud Company : 'टोरेस' नंतर 'या' कंपनीने घातला गरजूंना लाखोंचा गंडा; नेमकं काय प्रकरण ?
Kalyan : दुकानदार करायचा अश्लील मेसेज; संतापलेल्या तरुणीने दुकानात येऊन चोपला, कल्याणमधील घटना

गुंतवणूकदारांसाठी कंपनीकडून स्वतंत्र वॉलेट तयार करण्यात आले होते. या वॉलेटमध्ये त्यांची गुंतवणूक आणि टास्कनंतर मिळालेला मोबदला दिसत होता. सुरुवातीला मोबदला दाखवून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष पैसे काढण्यासाठी त्यांनी मागणी केली असता, कंपनीकडून वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. अनेक महिने उलटूनही कोणालाही पैसे मिळाले नाहीत. शेवटी गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Kalyan Fraud Company : 'टोरेस' नंतर 'या' कंपनीने घातला गरजूंना लाखोंचा गंडा; नेमकं काय प्रकरण ?
Kalyan: इमारतीची लिफ्ट ६व्या मजल्यावरून खाली कोसळली, ८ जणांपैकी चौघे जखमी, दोघांचा पाय फ्रॅक्चर

कंपनीच्या कथित सीईओ सुषमा पालकर यांना गुंतवणूकदारांनी थेट भेटून पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र त्यांनी देखील जबाबदारी टाळत गोंधळ घालणारी उत्तरे दिली. या सर्व प्रकारानंतर संतप्त गुंतवणूकदारांनी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यामुळे पोलीस ठाण्यात एकाचवेळी मोठी गर्दी जमा झाली.

Kalyan Fraud Company : 'टोरेस' नंतर 'या' कंपनीने घातला गरजूंना लाखोंचा गंडा; नेमकं काय प्रकरण ?
Kalyan : सोशल मीडियावर मैत्री, खासगी व्हिडीओवरुन ब्लॅकमेलिंग; बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीनं आयुष्य संपवलं

दरम्यान पोलिसांनी या फसवणूक करणाऱ्या कथित कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर आणि सीईओवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेत किती जणांची लूटमार करण्यात आली आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. टोरेस या फसवणूक करणाऱ्या कंपनीने देखील अशाच पद्धतीने लोकांना लुबाडलं होत. त्यांच्या जाळ्यात हजारो लोक अडकले होते तसेच त्यांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com