Kalyan: इमारतीची लिफ्ट ६व्या मजल्यावरून खाली कोसळली, ८ जणांपैकी चौघे जखमी, दोघांचा पाय फ्रॅक्चर

Kalyan West Tragedy: कल्याण पश्चिमेतील रॉयस गॅलेक्सी इमारतीची लिफ्ट सहाव्या मजल्यावरून कोसळली. लिफ्टमध्ये ८ जण होते, त्यापैकी ४ जण गंभीर जखमी, २ जणांचे पाय फ्रॅक्चर.
Kalyan West Tragedy
Kalyan West TragedySaam tv news
Published On
Summary
  • कल्याण पश्चिमेतील रॉयस गॅलेक्सी इमारतीची लिफ्ट सहाव्या मजल्यावरून कोसळली.

  • लिफ्टमध्ये ८ जण होते, त्यापैकी ४ जण गंभीर जखमी, २ जणांचे पाय फ्रॅक्चर.

  • नादुरुस्त लिफ्ट सुरू ठेवून रहिवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचा आरोप.

  • महापालिका अधिकारी आणि लिफ्ट मेंटेनन्स कंपनीवर रहिवाशांचा संताप.

कल्याण पश्चिममधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गांधारी परिसरातील रॉयस गॅलेक्सी इमारतीची लिफ्ट सहाव्या मजल्यावरून थेट खाली कोसळली. या लिफ्टमध्ये एकूण ८ जण प्रवास करीत असल्याची माहिती आहे. त्यापैकी चार जण गंभीर जखमी असून, दोघांचे पाय फ्रॅक्चर झाले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीतील पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या अंकित मेस्त्री यांच्या घरी गणेश दर्शनासाठी काही जण आले असताना हा अपघात घडला. गेल्या अनेक दिवसांपासून लिफ्ट मेंटेनेसमध्ये असल्याचे इमारतीतील रहिवाशांचे म्हणणे आहे. तरी देखील नादुरूस्त लिफ्ट सुरू ठेवण्यात आली होती.

Kalyan West Tragedy
बेपत्ता तरुणीचं गूढ उकललं; खंडाळ्यात खून अन् आंबा घाटात फेकलं, बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंडला संपवलं

इमारतीला दोन लिफ्ट असताना, अशा बिघडलेल्या लिफ्टचा वापर करून रहिवाशांच्या जीवाशी खेळ का करण्यात आला, असा संतप्त सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. या दुर्घटनेनंतर इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या लिफ्टमध्ये एकूण ८ जण होते. त्यापैकी ४ जण जखमी, तर २ जणांचा पाय मोडल्यानं गंभीर जखमी आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

Kalyan West Tragedy
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला धक्का! बड्या नेत्याची नाराजी उघड; थेट राजीनामाच दिला

दरम्यान, नादुरूस्त लिफ्ट सुरू ठेवण्यात आल्यामुळे रहिवाशांनी संताप व्यक्त केला. लिफ्ट मेंटेनन्स आणि फायर लाईन सुरक्षेकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात घडल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. दरम्यान, या अपघातानंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Kalyan West Tragedy
राष्ट्रीय महामार्गावर मृत्यूचं तांडव, कंटेनरनं ६ जणांना चिरडलं, जागीच प्राण सोडले, बीड हादरलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com