Kalyan : दुकानदार करायचा अश्लील मेसेज; संतापलेल्या तरुणीने दुकानात येऊन चोपला, कल्याणमधील घटना

Kalyan News : अश्लील मेसेज करणाऱ्या दुकानदाराला तरुणीने चोपल्याची घटना घडली आहे. कल्याणच्या कोळशेवाडीत घटना घडली आहे.
Kalyan
Kalyan News Saam tv
Published On
Summary

कल्याणच्या कोळशेवाडीत तरुणीला अश्लील मेसेज करून त्रास दिल्याप्रकरणी दुकानदाराला चोप

तरुणीने चपलीने मारहाण करत दुकानदाराला माफी मागायला भाग पाड

व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल क

कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी घटनेची दखल

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणच्या कोळशेवाडीतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुकानदार तरुणीला अश्लील मेसेज करून त्रास द्यायचा. त्रासाला वैतागल्यानंतर तरुणीने दुकानदाराला चोप दिला. तरुणीने या दुकानदाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी कल्याणच्या कोळशेवाडी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

Kalyan
अमरावतीत ST बसला उड्डाणपुलावर भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस बराच वेळ हवेतच लटकली

मिळलेल्या माहितीनुसार, कल्याण कोळशेवाडीत दुकानदार हा दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी तरुणीला अश्लील मेसेज करायचा. दुकानदाराच्या अश्लील मेसेजला तरुणी वैतागली होती. तरुणीने तिच्या कुटुंबीयांना प्रकार सांगितला. त्यानंतर तरुणी कुटुंबीयांसोबत दुकानात पोहोचली. त्यानंतर त्रस्त तरुणीने दुकानात शिरून दुकानदाराला चोपला.

Kalyan
Election : यंदा गुलाल कुणाचा? पंचायत समिती सभापती, उपसभापतीचे आरक्षण जाहीर, वाचा यादी

पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी दुकानदाराला चोप देण्यास सांगितलं. तरुणीने दुकानदाराला चपलीने देखील बडलले. त्यानंतर दुकानदाराला तरुणीची माफी मागण्यास भाग पाडले. तरुणीसोबत घडलेल्या प्रकरणानंतर कल्याणमध्ये पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे.

व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

कल्याणमधील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये पीडित तरुणी दुकानदाराला तिच्या चपलेने मारताना दिसतेय. त्यानंतर दुकानदार पाया पडून माफी मागतोय. व्हायरल व्हिडिओ 11 सप्टेंबर रोजीचा असल्याची माहिती मनसेचे पदाधिकारी यांनी दिली आहे.

Kalyan
35 गुण मिळवणारा मेरिटमध्ये येत नाही, त्यालाही अभ्यास करावा लागतो; सुधीर मुनगंटीवारांनी कुणावर साधला निशाणा?

मिळालेल्या माहितीनुसार, दुकानदार हा दुकानात काम करणाऱ्या तरुणीला अश्लील मेसेज पाठवत होता. तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. तरुणीने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगिला.त्यानंतर कुटुंबीय दुकानावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी दुकानदाराला जाब विचारला. या दरम्यान तरुणीने दुकानदाराला चांगलाच चोप दिला. स्थानिकानी दिलेल्या माहितीनुसार, या दुकानदाराने यापूर्वीही अनेक मुलींसोबत अशा प्रकारचे गैरवर्तन केले आहे. आता या व्हिडीओची दखल घेत पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेतले आहे. आता पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com