Nashik Jindal Company Fire: जिंदाल कंपनीतील तब्बल ५ हजार कामगारांवर उपासमारीची वेळ, काय आहे कारण?

Jindal Company Worker: नाशिक-मुंबई महामार्गावरील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत लागलेल्या आगीची चौकशी केली जाणार आहे. तेथील कामगारांवर उपासमारीची वेळ आलीय.
Nashik Jindal Company
Jindal Company Workersaam tv
Published On

नाशिक- मुंबई महामार्गावरील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीतील कामगारांवर उपासमारीची वेळ आलीय. काही दिवसांपूर्वी कंपनीमध्ये भीषण आग लागली होती, दोन ते तीन दिवस येथील आग धुमसत होती. या आगी प्रकरणाची चौकशी केली जाणार असून चौकशी होई पर्यंत कंपनीला उत्पादन करण्याचे आदेश देण्यात आलेत.

औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाने कंपनीला क्लोजर नोटीस पाठवत उत्पादनाचे काम तात्पुरते थांबविण्याचे आदेश दिलेत. कंपनीकडून जोपर्यंत सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना राबवली जात नाही. तसेच त्याबाबतीतल संबंधित प्रमाणपत्रे सादर केली जात नाहीत, तोपर्यंत उत्पादन पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाहीये. दरम्यान कंपनीला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात यश आले असले तरीही प्लांटमधून अजूनही धुराचे लोट बाहेर पडताना दिसताहेत.

Nashik Jindal Company
Amravati Airport : उड्डाणापूर्वी घडले अजबच; पेट्रोल न मिळाल्याने अमरावती मुंबई विमान फेरी रद्द, प्रवासी संतप्त

या आगीत कंपनीच्या प्रोडक्शन विभागातील अनेक यंत्रसामग्री, युनिट्स आणि कच्चा माल जळून खाक झालाय. दरम्यान या कंपनीत सुमारे ५ हजार कामगार कार्यरत होते. त्यापैकी अनेक कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत होते. आता सध्या काम बंद असल्याने बहुतांश कामगारांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यामुळे त्यांना पर्यायी रोजगाराचा शोध घ्यावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत सुमारे 3,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलीय. कंपनीचा विस्तार सुमारे 260 एकर क्षेत्रावर आहे. इतकी मोठी गुंतवणूक केली असताना सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला असल्याची प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालीय. आग लागली त्यावेळी कच्चा माल अव्यवस्थितरित्या साठवण्यात आलेला होता. शिवाय आग विझविण्यासाठी कोणतीही तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना उपलब्ध नव्हती.

त्यामुळे कंपनीकडून वरील सर्व प्रमाणपत्रे आणि अहवाल सादर केले जात नाहीत. तोपर्यंत कंपनीचे उत्पादन पुन्हा सुरू करता येणार नाहीये. दरम्यान कंपनीला उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी पुढील गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. यात स्थैर्यता प्रमाणपत्र, इलेक्ट्रिकल आणि स्ट्रक्चरल ऑडिटचे अहवाल, आग व सुरक्षा उपाययोजनांचा संपूर्ण अहवाल कमकुवत झालेल्या इमारतीच्या दुरुस्तीची प्रक्रिया आणि त्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com