
भरत मोहळकर, साम टीव्ही
हा आक्रोश आहे घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या दादरमधील टोरेस कंपनीच्या विरोधात....आयुष्यभर काबाडकष्ट करत पै-पै जमा करून मुंबई परिसरातील तब्बल 3 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी टोरेस कंपनीत गुंतवणूक केली होती. मात्र घसघशीत रिटर्न्स देण्याचा दावा करणारी टोरेस कंपनीचा मालक मुंबईकरांना 500 कोटींपेक्षा अधिक रकमेचा गंडा घालून पसार झाले आणि सर्व गुंतवणूकदारांचं धाबं दणाणलं..
टोरस कंपनीने रातोरात आपला गाशा गुंडाळल्याने दादरमध्ये नागरिक आक्रमक झाले. त्यानंतर पोलिस यंत्रणाही खडबडून जागी झालीय.. तर पोलिसांनी दादरमधून 3 आरोपींना बेड्या ठोकल्यात...टोरेसनं आकर्षक योजनांचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कसा गंडा घातला ते पाहूयात..
- एप्रिल 2024 मध्ये दादरमध्ये टोरेस नावाच्या कंपनीची सुरुवात
- सोनं, चांदी आणि हिऱ्याचे दागिने तसंच आकर्षक गुंतवणुकीची योजना
- दर आठवड्याला चार टक्के व्याजदराने परतावा देण्याचं आमिष
- हमी म्हणून गुंतवणूकदारांना मौल्यवान खडा आणि प्रशस्तीपत्रक
- 4 टक्क्यांचा व्याजदर आठवड्याला 11 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला
- दादर, नवी मुंबई आणि मिरा रोड मधील कार्यालय रातोरात बंद
- हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीचा मालक दुबईला फरार?
केवळ दादरच नव्हे तर मीरा-भाईंदरमध्ये टोरेसनं आपलं दुकान थाटलं होतं....त्याठिकाणीही गुंतवणूकदारांना तर परतावा म्हणून हिरा आणि प्रशस्तीपत्र देण्यात आलं....मात्र हा हिराही कंपनीसारखाच नकली निघाला....
या कंपनीनं मुंबई महानगर परिसरात सगळीकडेच आपले हातपाय पसरले आहेत...कल्याणमध्येही आपली शाखा खोलून अनेक गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलंय.
मात्र टोरेस कंपनीने घोटाळा केल्याचं समोर येताच नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून कंपनीचे अकाऊंट फ्रीज केलेत.
दरम्यान कंपनीने घोटाळ्याचं खापर कंपनीचे सीईओ तौसिफ रियाझ आणि सीए अभिषेक गुप्ता यांच्यावर फोडलंय.. कंपनीने नेमकं काय म्हटलंय? पाहूयात...
सीईओ तौसिफ रियाझ आणि सीए अभिषेक गुप्ताने रात्री कंपनीत दरोडा कंपनीत दरोडा घातला
दोघांनी अनेक महिन्यांपासून काही कर्माचाऱ्यांना हाताशी धरून कंपनीत आर्थिक घोटाळा केला
रात्रीतून श्रीमंत करण्याची आश्वासनं अनेक कंपन्यांकडून देण्यात येतात. त्यात लाखो लोक आपल्या आयुष्याची कमाई गमावून बसतात. त्यामुळे टोरेससारख्या कंपन्यांच्या अमिषाला बळी न पडता गुंतवणूदारांनी योग्य ठिकाणी सुरक्षित गुंतवणूक करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.