India-Pakistan War Saam Tv News
देश विदेश

india pakistan tensions : शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं प्रत्युत्तर; हवाई दलाचा पाकला इशारा, सीमेवर नेमकं काय घडलं?

india pakistan conflict : भारत पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीचं पाकने उल्लंघन केलं... त्यामुळे हवाई दलानं ऑपरेशन सिंदूर सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.. यामध्ये हवाई दलानं नेमकं काय म्हटलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून

Bharat Mohalkar

ऑपरेशन सिंदूरच्या याच धमक्यांनी बिथरलेला पाकिस्तान अमेरिकेपुढं रडला आणि शस्त्रसंधीसाठी मध्यस्थीची विनंती केली.. अखेर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली.. मात्र कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच हे पाकनं अवघ्या तीन तासात दाखवून दिलंय.. पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले केले.. त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं असलं तरी आता हवाई दलानं पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिलाय.

ऑपरेशन सिंदूर अजूनही संपलेलं नाही

योग्यवेळी सविस्तर माहिती देणार

आतापर्यंत दिलेली जबाबदारी वायुदलानं चोखपणे बजावली

कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

पहलगाम हल्ल्याचा बदला भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं घेतला.आधी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केले.. त्यानंतर कुरापतखोर पाकिस्तानच्या लष्कराची हवाई सुरक्षा यंत्रणा उध्वस्त करत पाकिस्तानला धडा शिकवला. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी अमेरिकेकडे विनवणी करु लागला.. अखेर अमेरिकेनं मध्यस्थी करत भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी घडवून आणली... मात्र पाकनं पुन्हा कुरापत काढलीय.. त्यापार्श्वभुमीवर हवाई दलानं ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.. मात्र याचा नेमका अर्थ काय? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलंय...

पाकिस्तानकडून होणारा कुठलंही दहशतवादी कृत्य हे युद्ध मानलं जाईल, असा स्पष्ट इशारा भारतानं दिलाय.. मात्र त्यानंतर पाकिस्ताननं द्विपक्षीय चर्चेचं उल्लंघन केलंय.. त्यामुळे आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत आता हवाई दल पुन्हा पाकिस्तानमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करणार की राजनैतिक दृष्टीकोनातून पाकिस्तानची कोंडी करणार? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ शिवसेनेकडून व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT