
हा विद्रोह आहे बलुचिस्तानमधील.... भारत पाकिस्तानमध्ये तणावाच्या पार्श्वभुमीवर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तान लष्कराला टार्गेट करायला सुरुवात केली.. एवढंच नाही तर पाकिस्तानी लष्कराची वाहनं उडवून दिले..त्यामुळे आता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या चर्चांनी जोर धरलाय.. मात्र बलुचिस्तानला स्वातंत्र्य मिळालं तर त्याचा पाकिस्तानला किती मोठा दणका बसणार आहे? पाहूयात...
बलुचिस्तानमध्ये 1 हजार 700 टन सोन्याचा साठा
तांब्याचं विशाल भांडार, 174.42 लाख कोटींची तांब्याची खाण
पाकमधील नैसर्गिक खनिजसाठे बलुचिस्तानमध्ये
बलुच स्वतंत्र झाल्यास पाकमध्ये उर्जासंकट निर्माण होणार
चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरवर प्रभाव पडणार
अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमा जवळ असल्याने संरक्षणाचा धोका
बलुचिस्तानमध्ये 4 लाख 25 हजार टन खजूर उत्पादन
बलुचिस्तानमध्ये 80 अब्ज डॉलरचा पर्यटन व्यवसाय
खरंतर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत... त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले.. मात्र आता पुन्हा एकदा बलुचिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडलीय.. त्यामुळे पाकची एकाच मोर्चावर नाही तर चहुबाजूंनी कोंडी झालीय...
2002 मध्ये झालेला विद्रोह हा पाकिस्तानी लष्कराने मोडून काढला होता..मात्र आता भारताने दिलेला दणका, आर्थिक संकटावर द्यावी लागत असलेली झुंज यादरम्यान बलुच आर्मीचा विरोध तीव्र होत चालला आहे.. त्यामुळे बलुचिस्तान स्वतंत्र झाल्यास पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.