india pakistan conflict : भारत-पाकिस्तानचा तणाव वाढला; मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Mumbai Police order : भारत-पाकिस्तानचा तणाव वाढलाय. यामुळे देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दोन्ही देशाच्या तणावादरम्यान मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
police news
police newssaam tv
Published On

भारत-पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दोन्ही देशाकडून एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले सुरु आहेत. पाकिस्तानकडून सुरु असलेल्या हल्ल्यात काही जवान शहीद झाले आहेत. तर भारताच्या सैन्य दलानेही पाकिस्तानच्या हवाईतळावर हल्ले केले आहेत. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरु आहेत. दोन्ही देशातील तणावाच्या स्थितीमुळे देशभरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन्ही देशाच्या तणावाच्या स्थितीदरम्यान मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या तणावादरम्यान मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आलं आहे. मुंबई पोलिसांनी आज शनिवारी एक महत्वाचा आदेश काढला आहे. पोलिसांनी मुंबईत फटाके फोडण्यावर बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनी ११ मेपासून ९ जूनपर्यंत फटाके आणि रॉकेट उडवण्यावर बंदी घातली आहे. या कालावधीत फटाके आणि रॉकेट उडवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई होणार आहे. भारत पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतला आहे.

police news
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्याचा बदला; 'मिशन सिंदूर' नाव का? वाचा स्पेशल रिपोर्ट, एका क्लिकवर

आदेशात काय म्हटलं आहे?

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे की, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ व्या, कलम १० मधील पोटकलम २ सह कलम ३३ च्या पोटकलम (१) च्या खंडनुसार मुंबई पोलिसांनी शहरात फटाके, रॉकेट उडवण्यावर बंदी घातली आहे. पोलिसांकडून या आदेशाची माहिती सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर, मेगाफोनवरून माहिती दिली जाणार आहे.

पुण्यातून जम्मूला जाणाऱ्या रेल्वे रद्द

पुण्यातून जम्मूकडे जाणाऱ्या रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यातून जम्मू तवी एक्सप्रेस दिल्लीपर्यंतच धावणार आहे. पुण्यातून सुटणारी जम्मू तवी एक्सप्रेस आज आणि उद्या दिल्लीपर्यंतच धावणार आहे. तसेच जम्मूमधून सुटणारी जम्मू तवी एक्सप्रेस दिल्लीवरून पुण्याच्या दिशेने निघणार आहे.

police news
India Pakistan Conflict : निवृत्तीच्या ३ महिने आधीच पाकिस्तानशी लढताना वीरमरण; सुभेदार मेजर शहीद, दोन मुलं पोरकी

आपत्कालीन परिस्थितीत आणि अपरिहार्य कारणांमुळे पुण्याहून सुटणाऱ्या रेल्वेमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच जोधपूर-पुणे (हडपसर) एक्सप्रेस आज आणि उद्या रद्द करण्यात आली आहे. १३ मेपर्यंत या दोन्ही रेल्वे गाड्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक बघण्याच्या प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com