Success Story Saam Tv
देश विदेश

Success Story: उधारीवर पुस्तके, इंटरनेटसाठी रोज पायपीट, युट्यूबवरुन शिक्षण; NEET पास; आता डॉक्टर होणार,आदिवासी मुलाची यशोगाथा वाचा

Success Story Of Tribal Boy: मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर एखादा व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होतो. असंच यश एका आदिवासी भागातील मुलाने गवसलं आहे. तो नीट परीक्ष पास झाला आहे.

Siddhi Hande

इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर कोणताही व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतो. बिकट परिस्थितीशी दोन हात करुन अनेकजण आपले स्वप्न पूर्ण करतात. असंच स्वप्न ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्याच्या एका १९ वर्षीय मुलाचे पूर्ण झाले आहे. ओडिशाचे एका आदिवासी मुलाने नीट परिक्षेत चांगले गुण मिळवले आहेत.

सनातन प्रधान असे या मुलाचे नाव आहे. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट पास करावी लागते. सनातन प्रधानने पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास केली आहे. सनातन हा कंधमाल जिल्ह्याच्या दुर्गम भागात राहतो.त्याने नीटच्या अभ्यासासाठी पुस्तके उधार घेतली होती. पुस्कके उधार घेऊन आणि युट्यूबवर अभ्यास करुन त्याने हे यश मिळवले आहे.

सनातनच्या गावात इंटरनेट नसल्याने तो रोज ३ किलोमीटर लांब जाऊन टेकडीवर अभ्यास करायचा. टेकडीवर बसून त्याने युट्यूबवर अभ्यास केला. सनातनच्या या यशाचे त्याच्या कुटुंबियांना खूप कौतुक आहे.

सनातनचे वडील कनेश्वर प्रधान हे दुर्गम तडीमहा गावात शेती करतात.सनातनने परिस्थिती फार चांगली नव्हती. परिस्थितीशी दोन हात करुन त्याने घवघवीत यश मिळवले आहे. सनातनने कोणत्याही प्रकारचे क्लासेस न लावता नीट परीक्षा पास केली आहे. तो आता सरकरी एकमेजीसी कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे. त्याला सध्या आर्थिक मदतीची गरज आहे.

दरिंगबाडीच्या शासकीय शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने बारावीसाठी प्रवेश घेतला. १२ वी पूर्ण केल्यानंतर तो नीटच्या परीक्षेच्या तयारीला लागला. गावात इंटरनेट सेवा नसल्याने त्याने तो रोज तीन ते चार किलोमीटर लांब जाऊन टेकडीवर अभ्यास करायचा. त्याच्या या यशाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT