Success Story : लाखात सुरुवात, आता ५० लाखांची कमाई, सीए जयश्रीच्या स्टार्टअपनं तुम्हीही व्हाल प्रभावित

Success Story of Jayashree Krishnamurthy : चेन्नईच्या जयश्री कृष्णमूर्ती यांच्या यशाची स्टोरी आपल्यासारख्या अनेकांना प्रेरणादायी ठरेल. फक्त लाखात सुरु केलेला व्यवसाय आता ५० लाखांपर्यंत पोहचलाय. पण तिला हे यश सहजासहजी मिळाले नाही.
Success Story of Jayashree Krishnamurthy :
Success StorySAAM TV
Published On

भारतात रोज नवीन व्यवसाय सुरु होत असतात. काही यशस्वी होतात तर काही अपयशी होतात. असाच एक व्यवसाय एका महिलेने सुरु केला. ज्याचे यश आती लाखोंच्या घरात पोहचला आहे. या महिलेला व्यवसाय सुरु करताना कोणी कल्पना दिली. तसेच कोणी मदत केली आणि व्यवसाय सुरु करण्याचं कारण काय? सर्व माहिती सविस्तर जाणून घ्या.

चेन्नईची रहिवासी सीए जयश्री कृष्णमूर्ती (Jayashree Krishnamurthy) हिने स्वबळावर एक अनोख्या स्टार्टअप व्यवसाय सुरु केला आहे. अवघ्या काही रुपयांच्या गुंतवणुकीतून तिने हे यश मिळवले आहे. आपण तिचा खडतर प्रवासाबद्दल उलगडूया. ही महिला सीए असून तिने १ लाख गुंतवणुकीवर आपला व्यवसाय सुरु केला. त्यांचा हा व्यवसाय धान्यावर आधारित आहे. जयश्री त्यापासून आरोग्यदायक पदार्थ बनवत असते. त्यांच्या या व्यवसायने लाखोंचा गल्ला केला आहे.

रोजच्या धावपळीच्या जीवनात सगळ्यांना काहीतरी चविष्ट आणि पौष्टिक खायचे असते. आजच्या युगात बाजारात खूप नवीन पदार्थ येत असतात. त्यामुळे फूड इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा वाढली आहे. खाण्याच्या पदार्थांचा व्यवसाय करणे खूप कठीण आहे. कारण आपली एक चूक ग्राहकांच्या आयु्ष्यावर बेतू शकते. मात्र जयश्री हीने स्वत:वर विश्वास ठेवून हा नवा व्यवसाय उभा केला आणि आता यात यश मिळत आहे. चेन्नईमध्ये राहणाऱ्या जयश्रीच्या व्यवसायाची वार्षिक रक्कम आज ५० लाखांवर पोहचली आहे. त्यांनी सुरु केलेल्या या नवीन स्टार्टअपमुळे त्यांना स्वतःला एक नवी ओळखलं मिळाली आहे. जयश्रीच्या फूड ब्रँडचे नाव 'रसा वेलनेस' आहे. तिचा हा व्यवसाय हेल्दी फूड म्हणून ओळखला जातो. 13 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या सीए जयश्री स्वतःची फर्म इन्फिनी कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड चालवतात.

यशाचा प्रवास

१३ वर्षापेक्षा जास्त सीएचा अनुभव असलेल्या जयश्रीने आपल्या व्यवसायाची सुरुवात घरापासून केली.त्यानंतर त्यांनी 'रसा वेलनेस' कंपनी उघडली. जयश्री चेन्नईमध्ये राहते. त्याच्या आयुष्यातील एक घटना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यास कारणीभूत ठरली. ती घटना अशी की, त्या आपल्या ८ वर्षाच्या मुलासाठी एका दुकानातून पेय विकत घेतले होते. ते पेय पिल्यानंत त्यांच्या लक्षात आले की, त्यात कोणतेच पौष्टिक घटक नाही आहेत. याच्या सेवनाने मुलांना कोणतेही पोषण मिळत नाही. हे लक्षात आल्यावर त्यांना मुलांच्या भविष्याची काळजी वाटू लागली. या सगळ्यावर विचार करून त्यांना मुलांसाठी असा एक पदार्थ तयार करायचा होता. ज्याने मुलांना पोषक द्रव्ये मिळतील. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरु केला.

Success Story of Jayashree Krishnamurthy :
Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

सीए झालेल्या जयश्रीने स्वतः ची रेसिपी बनवली. जी मुलांना खूप पोषण देईल. यासाठी त्यांनी कॅल्शियम, लोह आणि प्रथिने समृद्ध बाजरी आणि नाचणी वापरली. यासाठी तिला कुटुंबीयांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला. जयश्रीची ही पाककृती घरच्यांना खूप आवडली असून त्यांनी तिचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी ही रेसिपी आपल्या मुलाच्या मित्रांना खाऊ घातली. तिला चांगला प्रतिसाद येऊ लागला. तिच्या पदार्थांची मागणी वाढू लागली. तेव्हा तिने व्यवसाय करण्याचे ठरवले. जुलै 2022 मध्ये तिने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीने स्टार्टअप सुरू केले. जयश्रीची कंपनी आज ३० हून अधिक उत्पादने बनवते. यामध्ये इन्स्टंट हेल्थ ड्रिंक्स, लाडू, बाजरी कुकीज यांचा समावेश आहे. तिने सांगितले की तिच्या उत्पादनांमध्ये ग्लूटेन-मुक्त पीठ, गूळ, बाजरी यांचा समावेश आहे.जयश्री सांगते की, तिला बऱ्याच दिवसांपासून फूड संबंधित व्यवसाय सुरू करायचा होता. जयश्रीने तिच्या या व्यवसायातून समाजासाठी विशेषता महिलांसाठी एक उत्तम उदाहरण दिले आहे. स्वतःची इच्छा शक्ती मजबूत असेल तर माणूस काही करू शकतो.

Success Story of Jayashree Krishnamurthy :
मुंबई ते गोवा एका चार्जमध्ये गाठणार! 31 मिनिटांत होते चार्ज, 11 एअरबॅग; जबरदस्त आहे 'ही' कार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com