मुंबई : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेकदा अपयश आल्याचं आपण ऐकतो, अनेकजण निराश होवून दुसऱ्या क्षेत्रात जातात. परंतु हरियाणाच्या एका तरूणाला एक, दोन वेळेस नाही तर तब्बल ३५ वेळेस अपयश मिळालं. तरीही हार न मानता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले अन् यशाला गवसणी घातली. ही कहाणी आहे IAS विजय वर्धन यांची. आपण त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेवूया.
विजय वर्धन यांचा जन्म हरियाणातील सिरसा येथे झाला होता. त्यांचं बालपण देखील तिथेच गेलं. वर्धन यांनी सरकारी नोकरीच्या अपेक्षेने ३५ वेळा परीक्षा दिली होती. परंतु प्रत्येक वेळी त्यांना अपयशाचा सामना करावा लागला (UPSC Success Story) होता. परंतु हेच अपयश भविष्यात त्यांच्या मोठ्या यशाचा आधार बनणार होतं. शेवटी त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केलं.
३५ वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सतत नापास होऊन देखील वर्धन यांनी हार मानली (Success Story) नाही. यूपीएससी परीक्षेत देखील त्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. पण त्याचा स्वतःवर विश्वास कायम होता. अखेर २०१८ मध्ये विजय यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत १०४ वा क्रमांक (civil services) मिळविला. त्यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. पण त्यांचं स्वप्न आयएएस अधिकारी होण्याचं होतं.
स्वप्नपूर्तीसाठी विजय यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. यावेळी त्यांनी टॉप ७० मध्ये स्थान मिळवून आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. 'पराजयानंतर जे जिंकतात तेच खरे विजेते असतात' असं म्हटलं (IAS Vijay Vardhan) जातं. विजयची कथा देखील अशीच आहे. आपल्या अपयशातून शिकून ते प्रत्येक वेळेस पुढे जात राहिले. 'स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या कष्टाचे फळ नक्की मिळेल' असा विश्वास त्यांना होता. आज ते आयएएस अधिकारी आहेत. खरं तर त्यांचा संघर्ष प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. अपयश ही यशाची पायरी असते, हे विजय वर्धन यांचा प्रवास दाखवतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.