केंद्रिय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC परीक्षा देऊन मोठ्या पदावर सरकारी नोकरी मिळवण्याची संधी असते. यूपीएससीची परीक्षा ही देशातील सर्वात अवघड परीक्षा असते.या परीक्षेत पास होण्यासाठी अनेक वर्ष मन लावून जिद्दीने अभ्यास करावा लागतो. परंतु अनेकांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असते. त्याच तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.
UPSC ने नुकतीच लॅटरल एंट्री साठी अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता तरुणांची सरकारी नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. या नोकरीसाठी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे तरुण अर्ज करु शकतात. त्यामुळे आता यूपीएससी परीक्षा न देताच तरुणांना मोठ्या पदावर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
UPSC परीक्षेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना लॅटरल एंट्रीद्वारे मंत्रालयात संयुक्त सचिव पदावर नियुक्त केली आहे.मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
UPSC च्या अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारमध्ये काम करणारा कोणताही कर्मचारी या नोकरीसाठी अर्ज करु शकत नाही. परंतु राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणारे लोक या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. याशिवाय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्वायत्त संस्था, विद्यापीठे, खाजगी कंपन्या, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे लोक लॅटरल एंट्रअंतर्गत अर्ज करु शकतात.
४० ते ५५ वयोगटातील उमेदवार संयुक्त सचिव पदासाठी अर्ज करु शकतात. या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार, १४व्या वेतन स्तरानुसार पगार देण्यात येईल. त्यांचे मासिक उत्पन्न २,७०,००० रुपये आहे. याशिवाय प्रवास भत्ता आणि घरभाडे भत्ता दिला जातो.
३५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांची निवड संचालक पदासाठी केली जाणार आहे. त्यांना १३ व्या वेतन स्तरानुसार पगार देण्यात येईल. त्यांचे मासिक उत्पन्न २,३०,००० रुपये असेल. तर उपसचिव पदासाठी १,५२,००० रुपये पगार दिला जाईल. यूपीएससीच्या लॅटरल एंट्रीद्वारे ४५ पदांवर भरती केली जाणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.