House price Fall: खुशखबर! घरांच्या आणि जमिनीच्या किंमती झपाट्याने कमी होणार? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

GST Council : जीएसटी काउन्सिलची बैठक येत्या ९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत घर, फ्लॅटच्या किंमती कमी होण्याच्या उद्देशाने महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
House price Fall
House price FallSaam Tv
Published On

येत्या ९ सप्टेंबर रोजी GST काउन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील. या बैठकीत घरे आणि फ्लॅटच्या किंमती कमी होण्याच्या उद्देशातून निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. मिडिया रिपोर्टनुसार, रिअल इस्टेट डेव्लपर्संना जीएसटीपासून दिलासा मिळण्याची शक्यता असते.

जमिनीच्या खरेदीवर १८ टक्के जीएसटीचा प्रश्न लवकरच सोडवला जाऊ शकतो. याबाबत २२ ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो. जमिनीच्या खरेदी विक्रीवर १८ टक्के जीएसटी लागू करण्यात येणार होता. मात्र, याला रिअल इस्टेट डेव्हलपर्संनी विरोध केली आहे. यामुळे जमिनींची किंमत वाढते. त्यामुळे थेट फ्लॅट आणि घर महाग होतात.

GoM ने जर शिफारस केली तर ९ सप्टेंबरला होणाऱ्या जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या Developable Land खरेदी- विक्रीवर कोणताही जीएसटी लागू होत नाही. परंतु डेव्हलपमेंट राइट्सवर १८ टक्के जीएसटी लागू केल्याने जमिनींची किंमत वाढते. याचाच परिणाम घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर होतो. त्यामुळे घरांच्या किंमती वाढतात. यामुळे घर खरेदीदार जास्त प्रमाणात घर खरेदी करताना दिसत नाहीत. याबाबत अंतिम निर्णय जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.

House price Fall
PPF Scheme: दररोज ४१६ रुपयांची गुंतवणूक करा अन् करोडपती व्हा; काय आहे केंद्राची PPF योजना?

जमीन मालक आणि डेव्हलपर्सचा १८ टक्के जीएसटीला विरोध आहे. या मुद्द्यावर तेलंगणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु आहे. या संदर्भात GoM च्या शिफारसी महत्त्वाच्या ठरु शकतात.

House price Fall
Post Office MIS Scheme: फक्त एकदा गुंतवणूक करा अन् महिन्याला ५००० रुपये कमवा; पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com