Patanjali Ads Case Update : पतंजली फसव्या जाहिरात प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; न्यायालय रामदेव बाबांचा माफीनामा स्वीकारणार का?

Baba Ramdev News : आज सर्वोच्च न्यायालयात पतंजलीच्या फसव्या जाहिरातप्रकरणी सुनावणी पार पडणारा आहे. १६ एप्रिल रोजी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपीठासमोर शेवटची सुनावणी पार पडली होती.
We do not accept the Supreme Court on Ramdev Baba's Apology in Patanjali Misleading Ads Case
We do not accept the Supreme Court on Ramdev Baba's Apology in Patanjali Misleading Ads CaseRamdev Patanjali Misleading Ads

प्रमोद जगताप

पतंजलीच्या फसव्या जाहिरातप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणारा आहे. १६ एप्रिल रोजी न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपीठासमोर शेवटची सुनावणी पार पडली होती. त्यावेळी बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावतीने त्यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी माफी मागितली. कोर्टाच्या विनंतीवरून बाबा रामदेव यांनी कोर्टाची माफी मागितली होती. त्यावर आज पुढील सुनावणी पार पडणार आहे.

We do not accept the Supreme Court on Ramdev Baba's Apology in Patanjali Misleading Ads Case
Baba Ramdev यांच्या पतंजलीच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश | Marathi News

माफीनामा स्वीकारला नव्हता

बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन यांनी सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर केला होता. मात्र न्यायालयाने यावर कडक ताशेरे ओढत तो माफीनामा स्वीकारला नव्हता. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सूनवणीत खंडपीठाने कडक ताशेरे ओढले होते. ही माफी केवळ समाधानासाठी आहे. तुमच्यामध्ये कोणतीही क्षमेची भावना नाही, अशा शब्दांत न्यायालयाने ताशेरे ओढले होते.

मागच्या सुनावणीतील युक्तीवाद

रामदेव बाबा : आम्ही नेहमीच आयुर्वेदीक गोष्टी लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केला, यासाठी मोठ मोठे संशोधन केले. आमच्या जाहिरातीमधून आम्हाला लोकांना चुकीचे सांगायचे नाही. कामाचा उत्साह असल्याने उत्साहाच्याभरात हा प्रकार घडला आहे. आमच्याकडून पुन्हा असं होणार नाही.

कोर्ट : या प्रकरणी तुम्ही निर्दोष आहात असं जाणवत नाही. कारण तुम्ही अजूनही तुमच्या मुद्द्यावर ठाम आहात. या प्रकरणी पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे. तुम्ही दोघांनी (रामदेव-बाळकृष्ण) त्या दिवशीही कोर्टात हजर राहावे.

नेमकं प्रकरण काय?

इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजलीविरोधात खोट्या जाहिराती करत असल्याची याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत मागच्या दोन्ही सुनावणीवेळी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्णन न्यायालयात प्रत्यक्ष सूनावणीला हजर राहिले आहेत. आजच्या सुनावणीला देखील दोघांनाही प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

त्यावर आज होणाऱ्या सुनावणीत न्यायालय रामदेव यांचा माफीनामा स्वीकारणार की या प्रकरणाला आता पुढे कोणती दिशा मिळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

We do not accept the Supreme Court on Ramdev Baba's Apology in Patanjali Misleading Ads Case
Baba Ramdev: बाबा रामदेव यांची सुप्रीम कोर्टात धाव, बिहार- छत्तीसगढमधील गुन्हे रद्द करण्याची केली मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com