Vetal Tekdi Pune: वेताळ टेकडी वाचवण्यासाठी ठाकरे गट अन् पर्यावरण प्रेमी एकत्र; ट्रेकचे आयोजन

Pune News Today: गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील वेताळ टेकडीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.
Vetal Tekdi Pune
Vetal Tekdi PuneSaam Tv

अक्षय बडवे

Pune Vetal Tekdi News: गेल्या काही महिन्यांपासून पुण्यातील वेताळ टेकडीचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. टेकडी फोडून रस्ता बनवल्या जात असल्याने विविध स्तरातून या प्रकल्पाचा विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज वेताळ टेकडी ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. (Latest Marathi News)

Vetal Tekdi Pune
New Parliament Building: नवीन संसद भवनाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रमाचे वेळापत्रक

टेकडीवरील मारूती मंदिर येथे या ट्रेकची समाप्ती होईल. टेकडीचे महत्त्व समजण्यासाठी आणि पर्यावरण जनजागृती करिता या ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते यासह पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. यावेळी सर्व पर्यावरणप्रेमींच्या हातात सेव्ह वेताळ टेकडी असे फलकही दिसून आले.

पुण्यातील (Pune) कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्ता इथे होणारी वाहतूक कोंडीवर टेकडीच्या मधोमध कर्वे रस्ता ते सेनापती बापट रस्त्यावरील बालभारतीपर्यंत असा रस्ता प्रस्तावित आहे. यामध्ये वेताळ टेकडी फोडून तीन बोगदे तयार करणे, तीस मीटर रूंदीच्या पट्ट्यातील काही झाडे तोडावी लागणार आहे. यामुळे टेकडीवरील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होणार असल्याचे काही पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. (Pune News)

Vetal Tekdi Pune
Beed News: हृदयद्रावक! विद्युत तारेचा शॉक लागल्याने काका- पुतण्याचा जागीच मृत्यू

पुण्यातील वेताळ टेकडी

वेताळ टेकडी ही पुणे शहरातील तील एक महत्त्वाचा डोंगर आहे. पुण्याच्या (Pune) पश्चिमेला वसलेला ही टेकडी जैवविविधता आणि सौंदर्याच्या दृष्टीने पुणेकरांच्या आकर्षणाचे स्थान बनली आहे. पुणे शहराचा सर्वोच्च बिंदू याच टेकडीवर समुद्रसपाटीपासून ८०० मीटर उंचीवर आहे. वेताळ टेकडीचा विस्तार सुमारे साडेदहा चौरस किमी क्षेत्रात आहे.

वेताळ टेकडी हे नाव त्या टेकडीवर असलेल्या वेताळबाबाच्या देवळामुळे आले आहे. या देवळाजवळच वन विभागाने सद्ध्या एक उंच निरिक्षण मनोरा उभारला आहे. एस.एन.डी.टी,ला कॉ्लेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, गोखले नगर, सिंबायोसीस, पंचवटी, पत्रकार नगर या भागांमधे टेकडीचा विस्तार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com