New Parliament Building Inaguration Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (28 मे) दिल्लीतील नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. उद्घाटन सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 7.30 पासून हवन आणि पूजेने या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाचे औपचारिक उद्घाटन करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)
तर दुपारी मुख्य सोहळ्याला सुरूवात होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला ज्येष्ठ मंत्री, 25 राजकीय पक्षांचे सदस्य आणि धार्मिक नेत्यांसह अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.केंद्र सरकारच्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नवीन संसद भवन तयार करण्यात आले आहे. संसद भवन तयार करण्यासाठी 971 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी महंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे सेंगोल यावेळी संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की, सेंगोलला आज त्याचे योग्य स्थान मिळत आहे. तामिळनाडू हा प्रत्येक कालखंडात राष्ट्रवादाचा बालेकिल्ला राहिला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. तामिळ लोकांचे स्वातंत्र्यातील योगदान विसरले गेल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलून दाखवले.आम्ही आनंद भवनातून पवित्र सेंगोल येथे आणले आहे. (Delhi News)
हा सेंगोल ब्रिटिश राजवटीकडून भारतीय नागरिकांना सत्ता हस्तांतरणाचं प्रतीक आहे. अनेक राजकीय नेते आणि धार्मिक व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती या कार्यक्रमाची भव्यता वाढवणार आहे. हा उद्घाटन सोहळा नेत्रदीपक करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे.
नवीन संसदेच्या उद्घाटन समारंभाचा संपूर्ण कार्यक्रम
सकाळी 7.30 वाजता - हवन आणि पूजा
सकाळी 8.30 वाजता - सेंगोलची स्थापना
सकाळी 9 वाजता - प्रार्थना सभेचे आयोजन
दुपारी 12.00 वाजता - राष्ट्रगीत
दुपारी 12.10 वाजता - उपराष्ट्रपतींचे भाषण होणार आहे
दुपारी 12.17 वाजता 2 लघुपटांचे स्क्रीनिंग
दुपारी 12.29 वाजता - उपराष्ट्रपतींचे अभिभाषण वाचले जाईल
दुपारी 12.33 वाजता- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशासाठी दिलेला संदेश वाचला जाणार आहे.
दुपारी 12.38 वाजता - विरोधी पक्षनेते राज्यसभेला संबोधित करणार आहेत.
दुपारी 12.43 वाजता - स्पीकर जनतेला संबोधित करतील.
दुपारी 1.05 वाजता - पंतप्रधान मोदी 75 रुपयांचे नाणे जारी करतील.
दुपारी 1.10 वाजता - पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.