NITI Aayog Meeting: निती आयोगाच्या बैठकीत PM मोदींचा महत्वाचा संदेश; मुख्यमंत्र्यांना म्हणाले, "१४० कोटी जनतेसाठी"

PM Narendra Modi Massage: भारतातील १४० कोटी जनतेसाठी एक समान दृष्टी आणि समान रणनीती असायला हवी, असा महत्वाचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे
PM Narendra Modi Massage On NITI Aayog Meeting
PM Narendra Modi Massage On NITI Aayog MeetingANI/ Twitter
Published On

PM Narendra Modi Massage On NITI Aayog Meeting: भारतातील १४० कोटी जनतेसाठी एक समान दृष्टी आणि समान रणनीती असायला हवी, असा महत्वाचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील शनिवारी (२७ मे) दिल्लीत निती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना हा संदेश दिला आहे. (Breaking Marathi News)

PM Narendra Modi Massage On NITI Aayog Meeting
Mumbai High Court: मुंबई उच्च न्यायालयाला मिळाले नवे न्यायमूर्ती; पण फक्त ४ दिवसांसाठीच, कारण...

नरेंद्र मोदी यांनी देशातील मुख्यमंत्र्यांना योग्य दिशेने पावले उचलण्याचे निर्देश दिले. यावेळी अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे केंद्रीय मंत्री उपस्थित होते. मोदींनी नागरिकांची स्वप्ने पूर्ण करणारे कार्यक्रम तयार करण्यासाठी त्यांनी राज्यांना आर्थिकदृष्ट्या विवेकपूर्ण निर्णय घेण्यास सांगितले. (Latest Marathi News)

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागून आहे. असे पंतप्रधान मोदी म्हणाले. केंद्राकडून डिजिटल क्षेत्रात खूप काम केले जात आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात स्टार्टअप्स आहेत. याचा फायदा आपण घ्यायला हवा, आपण संधीचे सोने केले पाहिजे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.

राज्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते. २०४७ मध्ये विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक समान दृष्टीकोन तयार करा, असे आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले आहेत. दरम्यान, निती आयोगाच्या या बैठकीला जवळपास ११ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी दांडी मारल्याचं समोर आलं आहे.

यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, तेलंगणाचा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांचा समावेश आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com