Success Story: सरकारी शाळेत ३६ वर्षे शिक्षिका, टेरेसवर केली शेती; आता महिन्याला कमावते लाखो रुपये

Success Story Remabhai S Dragon Fruit Farming: केरळच्या शिक्षिकेने टेरेसवरच ड्रॅगन फ्रुटची शेती केली आहे. यातून त्या महिन्याला लाखो रुपये कमावतात.
Success Story
Success StoryGoogle
Published On

प्रत्येक व्यक्तीचा काही न काही छंद असतोच. परंतु कधी कामाच्या व्यापात किंवा पैसे कमावण्यासाठी नोकरी करावी लागते म्हणून आपण आपल्या आवडत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.परंतु तुम्ही किती मोठे झालात तरीही तुमची ती आवड तुमच्यासोबत असते. वय हा फक्त आकडा आहे. कोणत्याही वयात तुम्ही तुमचा छंद जपू शकतात. अशीच आवड केरळच्या रेमाभाई एस यांनी जपली अन् आज त्यात महिन्याला लाखो रुपये कमावतात.

Success Story
Success Story: गर्लफ्रेंडला देण्यासाठी ताजी फुले मिळाली नाहीत, तर पठ्ठ्यानं उभारली २०० कोटींची कंपनी; बॉयफ्रेंडच्या यशाची कहाणी वाचा

शिक्षक ते शेती प्रवास

रेमाभाई या शिक्षिका होत्या. त्यांनी ३६ वर्ष एका सरकारी शाळेत नोकरी केली. त्यानंतर त्यांनी त्याच शाळेत मुख्याध्यापिकेची जबाबदारीही पार पाडली.सेवानिवृत्तीनंतर रेमाभाई यांनी ड्रॅगन फ्रुटची शेती करायला सुरुवात केली अन् आज त्या महिन्याला लाखो रुपये कमावतात.

रेमाभाई यांनी त्यांच्या यशाबद्दल एका मुलाखतीत सांगितले आहे. त्यांची आई रोज त्या घरी यायच्या वेळेला त्यांची वाट पाहायच्या. परंतु त्यांच्या आईचं निधन झाले. आईचे निधन झाल्यानंतर त्यांना खूप एकटं एकटं वाटत होते.त्या १५ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. १३ भावंडांचे सर्व शिक्षण त्यांच्या आईने केले. आईच्या निधनानंतर त्या खूप एकट्या पडल्या होत्या.त्यात त्यांचा नवरा कामात व्यस्थ असायचे आणि मुलगा दिल्लीला राहायचा. त्यामुळे त्यांना खूप एकटं वाटायचे.

यामुळेच रेमाभाई यांनी आपली आवड जपायची ठरवली. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या टेरेसवर वेगवेगळ्या फळांच्या, फुलांच्या झाडांची लागवड केली. त्यांच्या भावना या झाडांशी जोडल्या गेल्या. त्यानंतर एकेदिवशी त्यांच्या मुलाने ड्रॅगन फ्रुटबद्दल माहिती दिली.

ड्रॅगन फ्रुटचे महत्त्व आईला सांगितले. त्यानंतर रेमाभाई यांनी ड्रॅगन फ्रुटची शेती करायचे, असं ठरवले. त्या आता दर महिन्याला जवळपास ५०० किलो ड्रॅगन फ्रुट उगवतात. त्यामुळे त्या आता महिन्याला १ लाख रुपये सहज कमावतात. (Remabhai S Success Story)

Success Story
Success Story: IIT पास, ७ वेळा स्टार्टअप अपयशी, जिद्द सोडली नाही... उभारली कोट्यवधींची कंपनी;Rapido च्या यशामागची कहाणी वाचा

मातीशिवाय उगवतात ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit Farmig)

रेमाभाऊ या टेरेसवर ड्रॅगन फ्रुटची शेती करत होत्या. यासाठी त्यांना खूप जास्त प्रमाणात मातीची गरज होती. परंतु टेरेसवर माती नेणे शक्य नव्हते त्यामळे त्यांनी सॉइललेस प्लाटिंग चा वापर करण्याचे ठरवले. त्यांच ही योजना यशस्वी ठरली. त्या मातीशिवाय ड्रॅगन फ्रुट कसे उगवतात. याची माहिती दिली आहे.

सर्वप्रथम एका प्लास्टिकच्या कंटेनरला खालील बाजूने छिद्र पाडा. त्यात हिरवा पालापाचोळा, त्यावर भाताचा थर ठेवा. याचे खत तयार होईल. त्यात तुम्ही १०० ग्रॅम बोन मिल टाका. त्यानंतर तुम्ही ड्रॅगन फ्रुट लावू शकतात. याबाबत बेटर इंडियाने माहिती दिली आहे.

Success Story
Success Story: IIT पास, ७ वेळा स्टार्टअप अपयशी, जिद्द सोडली नाही... उभारली कोट्यवधींची कंपनी;Rapido च्या यशामागची कहाणी वाचा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com