सोशल मीडियावर आपल्याला दररोज अनेक नवीन व्हिडिओ पाहायल मिळत असतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला हसू आवरत नाही तर अनेकदा आश्चर्याचा धक्का बसतो तर सोशल मीडियावर देशातील कानाकोपऱ्यातील घटना क्षणार्धात प्रत्येकापर्यंत पोहचून जातात.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात एका महिला शिक्षिका आणि एका शिक्षकामध्ये तूफान हाणामारी झालेली आहे.
सोशल मीडियावर आपल्याला दररोज आपण जे व्हायरल (Viral)व्हिडिओ पाहतो. त्यात शाळेतील विद्यार्थ्यांच्या मस्तीचे व्हिडिओ असतात तर कधी भरवर्गात एकमेंसोबत होत असलेल्या मारामारीचे असतात. इतकेच नाही तर कधी शाळेतील विविध कार्यक्रमांचे व्हिडिओ असतात.मात्र सध्या शाळेतील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,पंरतू हा मारामारीचा व्हिडिओ कोणत्या विद्यार्थ्यांचा नसून चक्क महिला शिक्षण आणि एका पुरुष शिक्षकाच्यामध्ये होत असलेल्या हाणामारीचा आहे. चला तर पाहूयात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील प्रकरण तरी काय?
व्हिडिओ काय?
व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका शाळेतील दिसत आहे. संपूर्ण व्हिडिओ शाळेत असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलमध्ये शुट केलेला आहे. व्हिडिओत एक महिला शिक्षिका आणि एक शिक्षक (Teacher)दिसत आहे. व्हिडिओच्या सुरुवाती पासुनच महिला त्या व्यक्तीवर आक्रमक होत असल्याते दिसते. महिला रागात असल्याने त्या व्यक्तीला हाताने मारत आहे मात्र तो व्यक्तीही प्रतिकार करताना त्या महिलेला मारतो. मात्र ही हाणामारी एवढी टोकाला जाते की महिला रागात त्या व्यक्तीशी बोलत असते आणि त्यावर आरोप करते.मात्र नक्की वाद कशामुळे झाले हे समजू शकलेले नाही.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''एक्स''वरील'@jitendrazavar' या अकाउटवर शेअर केलेला आहे. व्हिडिओ शेअर करण्यासोबत व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये''शाळा बनली आखाडा, महिला अन् पुरुष शिक्षकात हाणामारी'' असे लिहिण्यात आलेले आहे. व्हिडिओची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून नक्की व्हिडिओ कुठला आहे समजू शकलेले नसून नक्की कोणत्या प्रकरणावरुन वाद सुरु झाला हे समजू शकलेले नाही.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.