CCTV Viral : ठाण्यात दरोडेखारांचा डाव फसला; दुकानदाराने चोरांना धू धू धुतलं, VIDEO व्हायरल

Robbery in jewelery shop At Thane incident in CCTV : ठाण्यात ज्वेलरी शॉपमध्ये दरोडा पडल्याची घटना घडलीय. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय.
 ठाण्यात ज्वेलरी शॉपमध्ये दरोडा
Robbery in jewelery shop Saam Tv
Published On

विकास काटे, साम टीव्ही ठाणे

सोन्याच्या दुकानात चोरांचा दरोडा टाकण्याचा डाव फसलाय. दुकानदाराने थेट दांडा काढला अन् चोरांची पळती भुई थोडी झालीय. चोर धूम स्टाईलने चोरी करण्यासाठी आले, पण मार खावून पळाले आहेत. ही घटना ठाण्यामध्ये घडली. चोर अन् दुकानदारातील हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. ठाण्यातील दरोड्याचा सीसीटीव्ही समोर आलाय.

सोन्याच्या दुकानात दरोडा

ठाण्यातील बाळकुम नाका या ठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या चार इसमांनी सोन्याच्या दुकानात दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केलाय. सदरच्या घटनेत दुकानाच्या मालकाने त्यांना पळवून लावलंय. ही घटना (Robbery in jewelery shop) सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. पुढील तपास कापूरबावडी पोलीस करीत आहेत. या हल्ल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ज्वेलकी खूपच शांत वातावरण दिसत आहे, दुकानाचा मालक काउंटवर दिसत आहे. काही वेळानंतर तोंडाला मास्क लावलेले चारजण दुकानात चोरी करण्याच्या हेतुने येतात. दुकानदाराला बंदुक आणि शस्त्रांचा धाक दाखवत ते दुकानात शिरतात. दुकानदारावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. धमकावत दुकानदाराला मारहाण करण्यास सुरूवात (Thane News) करतात. तर दुसरा चोर दागिने चोरायला सुरूवात करतो. परंतु, दुकानदार मात्र खूप चालाकीने खुर्चीमागे असलेला दांडा काढतो अन् चोरांवर प्रतिहल्ला करतो.

 ठाण्यात ज्वेलरी शॉपमध्ये दरोडा
Jalna Robbery News : दोन लाख रुपयांची बॅग पळवली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद!

चोरांची पळता भुई थोडी

दुकानदार मोठ्या हिमतीने चोरांचा सामना करताना व्हिडिओमध्ये दिसत (Viral Video) आहे. तो दांड्याने चोरांना बेदम मारतो, बिचारे चोर चोरी करायचं सोडून धूम ठोकतात. चोर दुकानातून बाहेर पळून जाताना दिसत आहेत. दुकानदाराने प्रसंगावधान राखत दरोडा होण्यापासून वाचवला आहे. आता हा जिगरबाज दुकानदार ठाण्यात चर्चेचा विषय ठरलाय. दुकानदाराने चोरांना धू धू धुतलंय. ठाण्यात दरोडेखारांचा डाव फसला आहे. चोरांचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

 ठाण्यात ज्वेलरी शॉपमध्ये दरोडा
Shocking Video : खळबळजनक! दरोडेखोरांनी अवघ्या २ मिनिटातच लुटले ४० लाखांचे दागिने; लुटमारीचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com