जंगलाचा राजा सिंहाला प्रत्येक जण घाबरतो. फक्त माणूसच नाही तर प्राणी देखील सिंहाला घाबरतात. सिंहासोबत पंगा घेण्याची कोणीही हिंमत करू शकत नाही. पण गुजरातमध्ये दोन कुत्र्यांनी या सिंहाची पळता भुई थोडी केली. अवघ्या काही सेकंदामध्ये या कुत्र्यांनी दोन सिंहांना पळवून लावले आहे. भलामोठ्या सिंहापुढे छोटासा कुत्रा जिंकलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी देखील आश्चर्य व्यक्त करत आहेत.
व्हायरल होणारा सीसीटीव्ही व्हिडीओ गुजरातच्या गिर नॅशनल पार्कपासून ७० किलोमीटर अंतरावरील आहे. गुजरातमधील अमरेलीच्या सावरकुंडला येथील एका गोशाळाच्या गेटवर सिंह आणि कुत्रे आमने-सामने आले. रविवारी रात्री उशिरा गोशाळाच्या गेटवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत दोन सिंह कैद झाले.
हे सिंह गोशाळाच्या गेटमधून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. पण गेटच्या आतमध्ये असलेले २ कुत्रे या सिंहांवर जोरदार भुंकतात आणि त्यांना पळवून लावतात. या दोन सिंह आणि कुत्र्यांमध्ये गोशाळेचा गेट होता. सिंह गेटवर जोरदार धडक देत असतात त्यामुळे गेटची कडी उघडते. पत्र कुत्रे घाबरत नाही. ते सिंहांना पळवून लावतात.
कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून वॉचमन टॉर्च घेऊन येतो. तो टॉर्चने इकडे तिकडे पाहतो. गेटच्या बाहेर येऊन तो झाडाझुडपामध्ये कोण आहे का हे पाहतो. पण तोपर्यंत सिंह पळून गेलेले असतात. त्यानंतर वॉचमन गेटच्या आतमध्ये येऊन कडी लावून घेतो. हे सिंह रिझर्व वन क्षेत्रातून भटकत इथे आले असावेत. ही घटना गुजरातमध्ये जागतिक सिंह दिनाच्या दिवशीच घडते. गुजरातमध्ये आशियाई सिंहाची संख्या ६७४ इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.