Gujarat ATS Seized Drugs: भिवंडीत ८०० कोटींचं ड्रग्ज जप्त; गुजरात ATSची धडक कारवाई, ३ भावांनी फ्लॅटमध्ये टाकली होती Drugsची फॅक्टरी

Gujarat ATS Seized MD Drugs: गेल्या महिन्यात सुरतमध्ये एका ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केल्यानंतर, गुजरात एटीएसने आता एमडी ड्रग्ज तयार केल्याच्या आरोपाखाली भिवंडी येथून दोन आरोपींना अटक केली आहे.
Gujarat ATS Seized Drugs: भिवंडीत ८०० कोटींचं ड्रग्ज जप्त; गुजरात ATSची धडक कारवाई, ३ भावांनी फ्लॅटमध्ये टाकली होती  Drugsची फॅक्टरी
Gujarat ATS Seized MD Drugs
Published On

गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत भिंवडीमधील एका फ्लॅटमधून ८०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केलंय. एटीएसने गेल्या महिन्यात १८ जुलै रोजी सुरतमध्ये एका ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर एटीएसने या प्रकरणाचा अधिक तपास केला असता, मुंबईतील (एमएमआर) मध्ये येणाऱ्या भिवंडीतही एमडी ड्रग्जचा व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलं. त्यानंतर गुजरात एटीएसने भिंवडी येथील फ्लॅटमध्ये ड्रग्ज तयार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केलीय.

एटीएसच्या पथकाने घटनास्थळावरून ७९२ किलो लिक्विड एमडी ड्रग जप्त केले असून त्याची किंमत ८०० कोटी रुपये आहे. याप्रकरणी मोहम्मद युनूस आणि मोहम्मद आदिल यांना अटक करण्यात आलीय. एटीएसने केलेल्या कारवाईविषयी माहिती देतांना गुजरात एटीएसचे डीआयजी सुनील जोशी म्हणाले, हे दोघेही यापूर्वी दुबईत तस्करी करायचे. सुरत प्लांट प्रकरणात या दोघांची भूमिका समोर आली होती. यानंतर छापा टाकण्यात आला. यामध्ये एटीएसला हे यश मिळाले.

भिवंडीतील एका फ्लॅटमध्ये तीन भाऊ मिळून एमडी ड्रग्ज बनवण्याचे काम करत होते, असे जोशी यांनी सांगितले. अन्य एका प्रकरणात एटीएसला ट्रामाडोल नावाचे औषध भरूचमध्ये तयार होत असल्याचे आढळून आलं. याची निर्मिती पंकज राजपूत नावाच्या व्यक्ती करत होता. एटीएसने ३१ कोटी रुपयांचा माल जप्त केलाय. निखिल कपुरियाच्या सांगण्यावरून ही जिहादी बुलेट बनवली जात असल्याचे जोशी यांनी सांगितले. पंकज आणि निखिलला अद्याप अटक झालेली नाहीये. मुख्य आरोपी केवल गोंदलिया आणि हर्षित असून त्यांचा शोध सुरूय.

Gujarat ATS Seized Drugs: भिवंडीत ८०० कोटींचं ड्रग्ज जप्त; गुजरात ATSची धडक कारवाई, ३ भावांनी फ्लॅटमध्ये टाकली होती  Drugsची फॅक्टरी
Mumbai Crime: ३२७ कोटींचे ड्रग्ज जप्त, तस्करांची टोळी जाळ्यात अडकली, मास्टरमाइंड सलीम डोळा फरार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com