Success Story: गर्लफ्रेंडला देण्यासाठी ताजी फुले मिळाली नाहीत, तर पठ्ठ्यानं उभारली २०० कोटींची कंपनी; बॉयफ्रेंडच्या यशाची कहाणी वाचा

Ferns And Petals Owner Vikas Gutgutia Success Story: गर्लफ्रेंडला द्यायला फुले मिळाली नाहीत म्हणून विकास गुटगुटिया यांनी स्वतः ची कंपनी उभी केली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

Vikas Gutgutia Motivational Story: प्रत्येक व्यक्तीच्या यशामागे काही न काही संघर्ष हा असतोच. परंतु याच संघर्षाच्या काळात मेहनत केल्यावर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होतो.असंच यश भारतातील प्रसिद्ध उद्योजक विकास गुटगुटिया यांनी मिळवलं आहे. गर्लफ्रेंडला द्यायला बाजारात सुगंधी आणि ताजी फुले मिळाली नाही. परंतु हीच आयडिया वापरुन विकास यांनी स्वतः चा बिझनेस सुरु केला. आज त्यांची कोट्यवधींची कंपनी आहे.

आपल्याला मार्केटमध्ये अनेक फुलविक्रेते दिसतात. त्यांच्याजवळची फुले ही सकाळी ताजी असतात. परंतु दुपारी किंवा संध्याकाळी ही फुले कोमेजून जातात. हेच विकास यांच्या लक्षात आले आणि त्यांनी स्वतः चा बिझनेस सुरु केला.विकास यांनी फक्त ५००० रुपयांची गुंतवणूक करुन व्यवसाय सुरु केला. आज या बिझनेसचा टर्न ओवर कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. (Ferns And Petals Success Story)

Success Story
Success Story : २७ एकरात चंदनाची शेती, वर्षाला कोट्यवधींची उलाढाल, नगरच्या शेतकऱ्याची कमाल!

विकास गुटगुटिया यांच्या व्यवसायाची सुरुवात

प्रत्येक व्यवसाय सुरु करण्यामागे काही न काही कारण असते. प्रत्येकजण कोणत्या न कोणत्या गोष्टीतून प्रेरणा घेऊन स्टार्टअप सुरु करतो. विकास गुटगुटिया यांची प्रेरणा त्यांची गर्लफ्रेंड बनली. एकदा विकास यांना त्यांच्या गर्लफ्रेंडला फुले द्यायची होती. ते संपूर्ण दिल्लीतील मार्केट फिरले. परंतु त्यांच्या गर्लफ्रेंडला आवडतील अशी फुले त्यांना मार्केटमध्ये कुठेच दिसली. त्यामुळेच त्यांना फुलांच्या बिझनेसची आयडिया सुचली.

५००० रुपयांतून सुरु केला व्यवसाय

विकास यांनी फुलांचे दुकान उघडायचे ठरवले. त्यांनी १९९४ रोजी गिफ्ट आणि फुलांचे शॉप सुरु केले. व्यवसाय सुरु करताना त्यांनी ५००० रुपयांची गुंतवणूक केली. या व्यवसायामध्ये त्यांना एक पार्टनर मिळाला. त्याने २.५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांनी आपला बिझनेस मोठा केला. त्यांनी दिल्लीतील साउथ इक्स्टेंशन या ठिकाणी २०० फूट जागेत आपला पहिला फर्न्स अॅन पेटल्स नावाचे स्टोअर सुरु केले. (Vikas Gutgutia Success Story)

Success Story
Zudio Success Story: रतन टाटांच्या सावत्र भावाने सांगितलं Zudio च्या यशाचं सीक्रेट

विकास यांच्यासमोरचे आव्हान

विकास यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, फुलविक्रेत्यांचा सामना करणे हे सोपे नव्हते. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी एसी असलेले फुलांचे शॉप सुरु केले. एसी दुकानात फुले एकदम ताजी आणि सुंदर राहायची. तसेच त्यांनी या फुलांना डिझाइनर लूक दिले. त्यांनी हारांना वेगळे लूक दिले. त्यामुळे त्यांना कॉर्पोरेट ऑफिसमधूनदेखील ऑर्डर मिळायला सुरुवात केली.

यानंतर विकास यांनी आपली स्वतः ची वेबसाइट सुरु केली. त्यांनी या वेबसाइटच्या माध्यमातून फुले, पुष्पगुच्छ आणि हार विकण्यास सुरुवात केली. त्यांचे २००९ साली २५ कोटींचे नुकसान देखील झाले होते. मात्र, त्यांनी पुन्हा मेहनत करुन २०० कोटी रुपयांचा टर्न ओवर केला. त्यांच्या दुकानाची ब्रँच फक्त देशात नव्हे तर जगभरात आहेत.

Success Story
Nikki Tamboli Success Story: बाईsss....! आई ₹ ५० द्यायची, तेव्हा द्यायची ऑडिशन; बिग बॉसच्या निक्की तांबोळीचा संघर्ष एकदा वाचाच!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com