Nikki Tamboli Success Story: बाईsss....! आई ₹ ५० द्यायची, तेव्हा द्यायची ऑडिशन; बिग बॉसच्या निक्की तांबोळीचा संघर्ष एकदा वाचाच!

Bigg Boss Fame Nikki Tamboli Success Story: बिग बॉस मराठी 5 मध्ये येण्यापूर्वी निक्की अनेक हिंदी मालिक आणि चित्रपटात काम केले आहे. यावेळी निक्कीने तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाना उजाळा दिला.
Entertainment News
Nikki Tamboli Success StorySaam Tv
Published On

अभिनेत्री निक्की तांबोळी बिग बॉस मराठीमुळे सध्या जबरदस्त चर्चेत आहे. २८ जुलैपासून बिग बॉस मराठीचा ५ वा सीझन सुरू झाला.या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसांपासून निक्कीचा बिग बॉसच्या घरात गदारोळ सुरू झाला. निक्कीने आपल्या उत्कृष्ट अभिनय शैलीने प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळवली. निक्कीने बिग बॉसच्या घरात आल्यानंतर सर्वांशीच भांडण केले. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं होतं.

Entertainment News
KBC 16 : ५० लाखांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का?

सोशल मीडियावर निक्कीच्या वागणुकीवरुन तिला ट्रोल केले जात आहे. निक्की मराठी बिग बॉसपूर्वी हिंदी बिग बॉसमध्ये दिसली होती. त्यावेळी निक्कीला हिंदी बिग बॉस होस्ट सलमान खानने चागलंच झापलं होतं. यावरून मराठी बिग बॉसमध्ये निक्कीला का डोक्यावर घेतलंय? अश्या चर्चा सुरू आहेत.

बिग बॉस मराठी 5 मध्ये येण्यापूर्वी निक्की अनेक हिंदी मालिक आणि चित्रपटात काम केले आहे. अलीकडेच एका मुलाखतीत निक्कीने तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाना उजाळा दिला. निक्कीने सांगितले की, सुरूवातीला माझा इंडस्ट्रीशी काहीही संबंध नव्हता. कोणाशीही माझा फारसा संपर्क नसल्याने मला काय करावं हे कळत नव्हते. मी माझ्या कुटुंबासोबत डोबिंवलीत राहत होते. दरम्यान,माझी आई मला दररोज ५० रूपये पॉकेटमनी द्यायची. आणि ते ५० रूपये घेऊन मी डोबिंवली ते अंधेरी असा ऑडिशनसाठी प्रवास करायची.

सुरूवातीच्या काळातील पहिली दोन वर्षे माझ्यासाठी अत्यंत संघर्षाची होती. यावेळी मला अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागले होते. मी दररोज वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये ऑडिशनसाठी जायची. तेव्हा मला तुला बोलता येत नाही, तुला हसता येत नाही, तुला अभिनय करता येत नाही, असं म्हणून हिणवलं जात होतं.

सुरूवातीला मला नकारात्मकतेचा मोठा सामना करावा लागला. मी स्वतः वर प्रचंड विश्वास ठेवला.मी हरले नाही. माझ्या घरच्यांनी मला धीर दिला. यामध्ये सर्वात जास्त माझ्या आईचा वाटा आहे. १९,२० वर्षाची असताना मला पहिल्यांदा तमिळ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. जेव्हा मी माझा पहिला रिझ्यूमे दिला तेव्हा एका कास्टिंग डायरेक्टरने माझा फोटो दाखवला. त्यावेळी संपूर्ण टिमला बोलावून त्यांनी मला चित्रपटात काम करण्यासाठी सिलेक्ट केले. मात्र मागील दोन वर्षापासून सतत रिजेक्ट होत असल्याने मला विश्वासच बसत नव्हता की माझी चित्रपटासाठी निवड झाली आहे. तो पहिला चित्रपट 'कांचन 3' होता. कांचन चित्रपट चांगलाच गाजला यावेळी मला कांचना गर्ल म्हणून ओळखले जाऊ लागले.

मला वकिल व्हायचे होतं पण माझे ते स्वप्न होतं पण मला ते पूर्ण करता आलं नाही, निक्कीने सांगितले की, भारतात अनेक प्रकरणे पाहतो.अनेकांना न्याय मिळत नाही मला अशe लोकांसाठी लढा द्यायचा होता पण ते माझ्या नशिबात नव्हते. म्हणून ते मी झाले नाही, असे तिने सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com