नवी दिल्ली : संसदेत सुरु असलेल्या पहिल्या विशेष अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात पंतप्रधान मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. संविधान आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे. देशातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलाय, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'राष्ट्रपतींचं भाषण देशाशाठी प्रेरणा देणारं होतं. देशातील जनतेने तिसऱ्यांदा आम्हाला देशाची सेवा करण्याची संधी दिली आहे. काहींनी देशातील जनतेच्या विवेक बुद्धीवर प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आकडे आल्यापासून झेंडे घेऊन पळत होते'.
'देशातील जनतेने परफॉर्मन्सला प्राथमिकला दिली आहे. गावचा सरपंच देखील न राहिलेला व्यक्ती आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन काम करतोय. हे सगळं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे शक्य आहे. संविधान आमची सगळ्यात मोठी प्रेरणा राहिली आहे. देशातील जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळं आम्हाला तिसऱ्यांदा काम करायची संधी मिळाली, असेही नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'जनतेने मागील दहा वर्षांत विश्वास दाखवलाय. भविष्यातील नितीवरही विश्वास दाखवला आहे. देशात आम्हीच सक्षम पर्याय असल्याने जनतेला आमच्यावरच विश्वास दाखवला आहे. मागील दहा वर्षांत भारताची अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमाकांवर पोहोचवण्यात यश आलं आहे'.
'कोरोनाच्या कठीण काळात काम केलं. येणाऱ्या काळात मागच्या १० वर्षात केलेल्या कामानुसर आणखी गती वाढवू. येणारी ५ वर्ष गरीबाची लढाई लढण्यासाठी आम्ही खर्च करू. हा देश गरिबीच्या विरोधात लढत असलेल्या लढाईत विजयी होईल. देश जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था येत्या काळात बनेल, असाही विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.
दरम्यान, राज्यसभेतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. तसेच विरोधकांनी घोषणाबाजी देखील केल्या. मात्र, या गोंधळातही पंतप्रधान मोदींनी त्यांचं भाषण सुरुच ठेवलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.