Success Story : २७ एकरात चंदनाची शेती, वर्षाला कोट्यवधींची उलाढाल, नगरच्या शेतकऱ्याची कमाल!
Ahmednagar Success Story in Marathi : अहमदनगरमधील शेतकऱ्याने २७ एकर माळरानावर चंदन लागवड करत कोट्यवधींची उलाढाल केली. पारंपारिक शेती करत असताना २०१४ मधील दुष्काळात त्यांना मोठं नुकसान झाले. त्यामुळे त्यांनी कमी पाणी आणि कमी खर्चाची शेती करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामधूनच त्यांनी वेगळा प्रयोग करण्यासाठी फळझाडे केंद्रित शेती केली. २७ एकरमध्ये त्यांनी डाळिंब, संत्रा, आवळा, सीताफळ आणि त्यात आंतरपीक चंदन अशी एकात्मिक पीकपद्धतीची शेती केली. यातून त्यांना कोट्यवधींचा नफा झालाय. राजेंद्र रावसाहेब गाडेकर, असे त्या शेतकऱ्याचं नाव आहे. गाडेकर यांनी २७ एकरमध्ये १४ हजार चंदनाची झाडे लावली, त्यासाठी त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेतला. आज ते आपल्या शेतातील चंदनातून वेगवेगळे पदार्थ तयार करतात. चंदन अगरबत्ती, तेल, चंदन पावडर सह इतर गोष्टी तयार करुन विक्री करतात.
राजेंद्र रावसाहेब गाडेकर यांनी पिंपळनेरमधील माळरानावरच्या २७ एकरांत डाळिंब, संत्रा, आवळा, सीताफळ आणि त्यात आंतरपीक चंदन अशी एकात्मिक पीकपद्धतीची शेती केली. बाजारात असलेला उंची दर, अर्थकारण व अन्य राज्यांना भेटी देऊन चंदन हे पीक त्यांनी निवडले. त्यातून कोट्यवधींचा फायदा होत आहे. स्वत:ला आर्थिक फायदा झाल्यानंतर त्यांनी परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठीही हातभार लावला. गाडेकर यांनी जवळपास ४०० शेतकऱ्यांना चंदन शेतीसाठी मदत केली. आज अहमदनगरमध्ये गाडेकर हे नाव प्रसिद्ध आहे.
२०१७-१८ मध्ये मदुराई (तमीळनाडू) येथून गाडेकर यांनी सफेद चंदनाची रोपे आणली. दोन टप्प्यांत एकाच वर्षात सुमारे सत्तावीस एकरांत डाळिंब, संत्रा, आवळा, सीताफळ आदी पिकांत चंदनाच्या रोपांची लागवड केली. शेतामध्ये असा प्रयोग करणारे गाडेकर नगरमधील पहिलेच शेतकरी ठरले होते. संपूर्ण तीस एकरांत ठिबकसिंचनाची सोय केली आहे. सामूहिक शेततळे योजनेतून एक कोटी ७५ लाख लिटर क्षमतेचे शेततळेही बांधलेय. दोन विहिरींचा आधार. चंदनाला आठवड्याला ४ लिटर पाणी पुरते.
१३ एकर डाळिंब, चंदनाचे अंतरपिक, ४ एकर संत्रा, ९ एकर सीताफळ, एक एकरावर आंबा व आवळा लावण्यात आला आहे. चंदनाच्या झाडाला साधारण तीन वर्षांत बिया येतात. त्यांना ३०० ते ६०० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. चंदनाचे झाड स्वतः अन्न तयार करत नाही. त्यात्यामुळे शेजारी कडुनिंबाचे झाड असले तर चंदनाच्या वाढीला फायदा होतो. गाडेकर यांनी प्रत्येक चंदनाजवळ एक कडुनिंबाचं झाल लावले. चंदनाची भविष्यात चोरीही होऊ शकते, त्यामुळे झाडांच्या सुरक्षेसाठी शिकेकाई, सागरगोटा, केकताड आदी काटेरी वनस्पतींची व सौर कुंपणाची सुविधा केली. चंदनाशिवाय सिताफळ, डाळिंब, संत्रा, अंबा आणि आवळ्यातूनही गाडेकर यांना आर्थिक फायदा होतो.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.