राजधानी दिल्लीमध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहे. या प्रदूषणामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला. या वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. राजधानी दिल्लीमध्ये एका आठवड्यासाठी ऑड इव्हन फॉर्म्यूला लागू करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या निर्णय घेण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून दिल्लीतील हवेची गुणवत्ता खूप खराब झाली आहे. त्यामुळे प्रदूषणाची स्तर जास्त असल्यामुळे दिल्लीमधील प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ऑड-इव्हन फॉर्म्यूला लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल रॉय (Gopal Roy) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 13 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत ऑड-इव्हन फॉर्म्यूला (Odd Even Formula) लागू करण्यात येणार आहे. 20 तारखेपर्यंत 10 वी आणि 12 वीचे वर्ग सोडून सर्व शाळांना आधीच सुट्टी देण्यात आली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तसेच दिल्लीतील सगळ्या बांधकामाच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, प्रदूषित वातावरण आणि दूषित वारे यांच्यामुळे रविवारी सलग सहाव्या दिवशी दिल्लीत वातावरण सर्वाधिक प्रदूषित होते. दिल्लीचा हवा प्रदूषणाचा निर्देशांक (AQI) हा 'अत्यंत गंभीर' श्रेणीत पोहोचला आहे. त्यामुळे सरकारने हे मोठे निर्णय घेतले आहेत. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.