Massive Anti Naxal Operation  Saam tv
देश विदेश

सर्वात मोठी बातमी! जहाल नक्षलवादी हिडमा चकमकीत ठार, ६ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले

Latest update on AP–Chhattisgarh Maoist encounters : छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेजवळ सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात झालेल्या मोठ्या चकमकीत जहाल नक्षलवादी कमांडर हिडमा आणि त्याची पत्नी राजे ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

  • आज सकाळी ग्रेहाउंड दलाची नक्षलवाद्यांसोबत भीषण चकमक झाली.

  • सहा नक्षलवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • डीजीपी हरीशकुमार गुप्ता यांनी चकमकीची पुष्टी केली.

  • तीन राज्यांच्या सीमेवरील नक्षल वाढीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी कारवाई आणखी तीव्र केली आहे.

Naxal Commander Hidma Killed: छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये आज सकाळी जोरदार चकमक झाली. यामध्ये सहा नक्षलवाद्यांना ठाकर करण्यात आले आहे. यामध्ये बस्तरचा सर्वात जहाल नक्षलवादी कमांडर हिडमा आणि त्याची पत्नी राजे यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली भागात घडली आहे.

आंध्र प्रदेशातील ग्रेहाउंड सैनिकांकडून मागील काही दिवसांपासून सीमेवर शोध अभियान सुरू आहे. आज सकाळी छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवरील अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली येथे माओवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले. सकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान झालेल्या या गोळीबारात दोन्ही बाजूंनी अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांना सहा नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. पोलिसांकडून जंगलात सर्च ऑपरेशन अद्याप सुरूच ठेवण्यात आले आहे.

आज सकाळी झालेल्या चकमकीत ६ नक्षलवादी ठार झाल्याची अधिकृत माहिती डीजीपी हरीशकुमार गुप्ता यांनी दिली आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका वरिष्ठ नक्षली नेत्याचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. सुरक्षा दलांनी घटनास्थळी अद्याप शोध मोहीम सुरूच ठेवली आहे. आजूबाजूच्या घनदाट जंगलात शोध मोहीम आणखी तीव्र केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश-छत्तीसगड-ओडिशा या राज्याच्या सीमा ऊाहाक अनेक वर्षांपासून नक्षली कारवाया होत आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये अधिक वाढ झाली. त्यामुळे पोलिसांकडूनही जशास तसे उत्तर देण्यास सुरूवात झाली. राज्याचे डीजीपी हरीश कुमार गुप्ता परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Late Dinner Effect: रात्री उशिरा जेवण केल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

Crime News : संभाजीनगरमध्ये गँगवॉर; घरावर दगडफेक, तरुणावर झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: सांगलीत शेतकऱ्यांचा एल्गार

Skin Care Tips : स्वस्तात मस्त टोमॅटो करेल १० मिनिटांत टॅनिंग दूर, तुम्ही महागडे स्कीन प्रोडक्ट फेकून द्याल

Nath Blouse Design: नथीच्या डिझाईनमध्ये ब्लाऊजचे 5 प्रकार, मराठमोळा लूकवर शोभून दिसेल

SCROLL FOR NEXT