Zilha Parishad Elections : मोठी बातमी! ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची संभाव्य तारीख समोर, वाचा कसा असेल प्रोग्राम

Maharashtra Local Body Election News Update : राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समिती निवडणुकांची संभाव्य तारीख समोर आली असून ५ डिसेंबरला निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आयोगाकडून नोव्हेंबर अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अधिकृत घोषणा होणार आहे.
Panchayat Samiti elections Maharashtra News
Maharashtra ZP–Panchayat Samiti elections likely to enter Phase 2 as poll announcement expected soon.saam tv
Published On

Zilla Parishads Panchayat Samiti Elections : पहिल्या टप्प्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुका अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. पण त्याआधीच राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची (ZP Elections 2025) चर्चा सुरू झाली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळीची संभाव्य तारीख समोर आली आहे. ३२ जिल्हा परिषद आणि ३३१ पंचायत समितिच्या निवडणुका ५ डिसेंबर रोजी (Expected date for ZP and Panchayat Samiti elections 2025) होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, नांदेड, बीड, अहमदनगर आणि अमरावती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत, ज्यांची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत.  तर तिसऱ्या टप्प्यान महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. (Maharashtra local body elections second phase schedule)

काही दिवसांपूर्वी ११२ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती दिली. हे सर्वजण आता दोन आठवड्यात बदलीच्या ठिकाणी हजर होतील, अने कार्यभार सांभाळतील. त्यानंतर दैनंदिन अहवाल विभागीय आयुक्तांकडून मागवण्यात येईल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडू शकतो, अशी माहिती सकाळला राज्य निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Panchayat Samiti elections Maharashtra News
Mumbai CNG Crisis: मुंबईकरांचे हाल! ऑटो अन् टॅक्सी ठप्प, बसमध्ये प्रचंड गर्दी; नेमकं कारण काय ?

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबर अखेरीस अथवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जाईल, असे सांगण्यात येतेय. पाच डिसेंबरच्या आसपास राज्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतात. त्यानंतर सात दिवस अर्ज स्विकृतीसाठी देण्यात येतील. त्यानंतर सात दिवस अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. छाननी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. ३१ डिसेंबरच्या आतमध्ये जिल्हा परिषद निवडणुका पूर्ण करण्याचे आयोगाने ठरवले आहे.

Panchayat Samiti elections Maharashtra News
Local Body Election : नाशिकमध्ये ठाकरेंना जोरदार धक्का, हुकमी एक्का भाजपात प्रवेश करणार

महापालिका निवडणुका कधी लागणार ?

राज्यात तिसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. ३१ जानेवारीच्या आधी महापालिका निवडणुका होतील, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. डिसेंबर अखेरीस आयोगाकडून राज्यातील सर्व महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते. मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक एकाचवेळी होणार असल्याचे समजतेय.

Panchayat Samiti elections Maharashtra News
Mumbai Local : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल सेवा खोळंबली, ठाण्याकडे जाणारी मार्गिका ठप्प

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com