मध्य रेल्वेची मुंबई–ठाणे लोकल सेवा तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली.
घाटकोपर व विक्रोळी येथे तांत्रिक समस्या झाल्याने दोन्ही मार्गांची वाहतूक विस्कळीत.
सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल लेट झाल्याने प्रवाशांचा त्रास वाढला.
सीएनजी तुटवड्यामुळे रस्तेमार्गाने जाणाऱ्या प्रवाशांना ऑटो भाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ.
Mumbai Local Train Update : मध्य रेल्वेच्या लोकल प्रवाशांना (Central Railway) पुन्हा एकदा गैरसोयीचा सामना करावा लागलाय. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईकडून ठाण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर ठाण्याकडून मुंबईकडे येणारी लोकल सेवे विलंबाने धावत आहे. गर्दीच्या वेळी लोकल ठप्प झाल्याने मुंबईकरांचा संताप अनावर झाला आहे. ऑफिसमध्ये जाण्याच्या घाईगडबडीत असतानाच मुंबई लोकल विस्कळीत झाल्याचा फटका अनेकांना बसलाय. (Mumbai to Thane local train halted latest update)
मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल सेवा ठप्प झाली आहे. तांत्रिक कारणामुळे ठाण्याकडे जाणारी मार्गिका बंद असल्याची माहिती प्रवाशांकडून देण्यात आली आहे. घाटकोपर आणि विक्रोळी या स्थानकांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकलसेवेवर परिणाम झाला आहे. सकाळच्य सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना लोकल लेट झाल्यामुळे फटका बसत आहे. अनेकांनी रस्ते मार्गे जाण्याचा निर्णय घेतला. पण शहरात सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे ऑटो चालकाकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेण्यात येत आहेत.
मंगळवारी सकाळी ऑफिसला जाण्याची घाई असतानाच मध्य रेल्वेची लोकल सेवा खोळंबली. कल्याण, बदलापूर, भिवंडी, डोंबिवली, ठाण्याहून अनेकजण कामासाठी लोकलने प्रवास करतात. पण आज सकाळी अचानक लोकल खोळबंली. मुंबई-ठाणे आणि ठाणे मुंबई या दोन्ही मार्गाच्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईकडून ठाण्याकडे जाणारी लोकल ठप्प आहे. तर ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा १० मिनिटे उशिराने असल्याचे समजतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.