

शिवसेना (ठाकरे) गटाचे उपनेते अद्वय हिरे पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत.
हिरे हे मंत्री दादा भुसे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात.
हिरेंच्या भाजप प्रवेशामुळे नवीन समीकरणे तयार होणार आहेत.
आगामी निवडणुकांपूर्वी या घडामोडीमुळे नाशिकच्या राजकारणात मोठे बदल झाले.
Nashik Latest Marathi News : नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड झाली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते अद्वै हिरे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीत ठाकरे सेनेकडून निवडणूक लढवलेले हिरे आता भाजपमध्ये परतणार असल्याचे समोर आले आहे. हिरे हे मंत्री दादा भुसे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. त्यामुळे,
आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्या भाजप प्रवेशामुळे दादा भुसे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिरे यांच्यावर काही गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांनी हा पक्षबदलाचा निर्णय घेतल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पक्षप्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यातील, विशेषतः मालेगावमधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. उपनेते अद्वय हिरे पुन्हा भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश होणार असल्याचे समजतेय. अद्वय हिरे हे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. मंत्री दादा भुसे यांना भाजपाकडून शह देण्याचा प्रयत्न आगामी महापालिका निवडणुकीत होत आहे का? अशी चर्चा नाशिकमध्ये सुरू झाली आहे. हिरे यांनी जय महाराष्ट्र केल्यामुळे नाशिकमध्ये ठाकरेंची ताकद आणखी कमी झाल्याचे बोलले जातेय.
निवडणुका जस जशा जवळ येऊ लागताच पक्षानंतरच्या घटनेत वाढ झाल्याचं पहायला मिलत आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये सोमवारी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते कामगारांना साहित्या वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न होताच. शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अदव्य हिरे यांचे समर्थक असलेल्या मालेगावातील माजी नगरसेवकांसह ग्रामीण भागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मालेगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली तर ठाकरे गटाला खिंडार पडले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.