पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा ४–५ गाड्यांची जोरदार धडक झाली.
गेल्या आठवड्यातच झालेल्या भीषण अपघातानंतर आणखी एक घटना घडली.
अपघातानंतर पुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याची प्रक्रिया सुरू केली.
Pune Navale Bridge accidents news : पुण्यातील नवले पुलावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. दुपारी नवले पुलाच्या तीव्र उतारावर चार ते पाच गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली आहे. गेल्या आठवड्यात नवले पुलावर भयंकर अपघात झाला होता. त्यामध्ये आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज दुपारच्या वेळी नवले पुलाच्या तीव्र उतारावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. अपघातानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. (Pune Navale Bridge Another Accident 4–5 Cars Collide on Steep Slope latest marathi news)
नवले पुलावरील अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला आहे. नवे पूलावर पुन्हा अपघात का झाला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण गेल्या आठवड्यात ८ जणांचा मृत्यू झाला होता, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा चार ते पाच वाहनांची जोरदार धडक झाली. अपघातात एक कंटेनरसह ३ ते चार वाहनांचे नुकसान झाले आहे. तीव्र उतारावरून पुढे आलेल्या गाड्या एकमेकांना जोरदार धडकल्याने अपघात झाला.
आठवडाभरात दुसरी मोठी दुर्घटना घडल्याने पुणेकरांमध्ये चिंता वाढली आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. या अपघातामध्ये अद्याप जिवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. एक ते दोन जणांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे नेमकं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून कऱण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.