

GAIL pipeline issue affecting Mumbai CNG supply : मुंबई आणि उपनगरात मागील दोन दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा झाला आहे. त्यामुळे सीएनजी पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिलत आहेत. अचानक वाढलेली मागणी आणि पुरवठ्याच्या अभावामुळे पंपांच्या बाहेर रांगाच रांगा लागल्या आहेत. (Mumbai autos and taxis off road due to CNG shortage)
सीएनजी उपलब्ध नसल्यामुळे रिक्षा, टॅक्सी आणि इतर सीएनजी वाहने ठप्प झाली आहेत. अनेकांना सीएनजी मिळत नसल्याने वाहने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसत आहे. त्यात बेस्ट बसमध्ये प्रचंड गर्दी आहे. ऑफिसला जायचे कसे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित राहिला आहे. काही ठिकाणी रिक्षा चालक अतिरिक्त पैसे आकारात असल्याचेही निदर्शनास आले आहे.
मुंबईतील चेंबूरमधील गेल (GAIL) कंपनीच्या मुख्य नैसर्गिक वायू पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. वडाळामधील महानगर गॅस लिमिटेड (MGL) च्या सिटी गेट स्टेशन (CGS) ला होणारा गॅस पुरवठा खंडित झाला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सीएनजी (CNG) पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाल्याचे दिसतेय. मुंबई आणि उपनगरातील सीएनजी पंपांच्या बाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावर कमी प्रमाणात वाहने दिसून येत आहेत.
ऑटो, टॅक्सी आणि बस यासाठी लागणारा आवश्यक सीएनजी गॅस न मिळाल्याने अनेक वाहने बंद आहेत. त्याचा परिणाम ऐन कामाच्या दिवशी मुंबईकरांचा खोळंबा झाला. मुंबईकरांना रस्त्यांवर रिक्षा-टॅक्सी शोधताना मोठी कसरत करावी लागतेय. काही खासगी वाहनचालकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावर ताण तर पडतोय,पण वेळही जातोय.
महानगरच्या ३८९ सीएनजी पंपांपैकी २२५ पंप सध्या सुरू आहेत. वडाळ्यातील सिटी गेट स्टेशन (CGS) ला होणारा गॅस पुरवठा सुरळित झाल्यानंतर सीएनजी सेवा पूर्वरत होईल. पाईपलाईन दुरूस्तीचे काम सध्या प्रगतीपथावर असून आज दुपारपर्यंत पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आज रात्रीपासून मुंबई आणि उपनगरातील सीएनजी सेवा सुरळीत होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.