Narendra Modi ANI
देश विदेश

Narendra Modi : 'संभ्रम पसरवला..' गोध्रा हत्याकांडावर प्रथमच बोलले पंतप्रधान मोदी, म्हणाले, '२००२ नंतर गुजरातमध्ये दंगल..'

Narendra Modi Podcast : अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमॅन यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांनी पॉडकास्ट केला. यात मोदी यांनी पहिल्यांदा २००२ ग्रोधा हत्याकांड या विषयावर भाष्य केले. मोदी नेमकं काय म्हणाले? वाचा..

Yash Shirke

Narendra Modi Statement : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमॅन यांच्या पॉडकास्ट चॅनला भेट दिली. सव्वा तीन तास चाललेल्या या पॉडकास्टमध्ये नरेंद्र मोदी यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. एआय, तंत्रज्ञान, राजकारण यांसारख्या अनेक गोष्टींवर दोघांमध्ये चर्चा झाली. या पॉडकास्टमध्ये २००२ गुजरात दंगली या विषयावर मोदींनी बाजू मांडली. गुजरात दंगलीसंबंधित संभ्रम पसरवण्यात आल्याचे पीए मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, '७ ऑक्टोबर २००१ रोजी माझ्यावर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावेळी गुजरात विनाशकारी भूकंपातून सावरत होता. या भूकंपामध्ये हजारो लोक मारले गेले होते. शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवसापासून मी कामात गुंतलो. माझ्याकडे सरकारी काम करण्याचा अनुभव नवह्ता. आयुष्यात पहिल्यांदा निवडणुकीला उभा राहिला होता. २४ फेब्रुवारी २००२ रोजी मी पहिल्यांदाच आमदार झालो.'

'२७ फेब्रुवारी २००२ रोजी आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभेत बसलो होतो. त्याच दरम्यान गोध्रा दुर्घटनेची माहिती समोर आली. ती एक भयानक घटना होती. लोकांना जिवंत जाळण्यात आले होते. मागील सर्व घटनांची पार्श्वभूमी आणि इतक्या मोठ्या संख्येने लोकांना जिवंत जाळण्याची घटना, कल्पना करा तेव्हा काय परिस्थिती असेल', असे मोदींनी सांगितले.

नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, 'त्यावेळी विरोधकांची सत्ता होती. त्यांनी आमच्यावर खोट्या केसेस टाकून आम्हाला शिक्षा व्हावी यासाठी विरोधकांनी प्रयत्न केले. पण न्यायालयासमोर त्यांचे प्रयत्न फोल ठरले. न्यायव्यवस्थेने संपूर्ण घटनेचे तपशीलवार विश्लेषण केले. आरोपींना शिक्षा झाली. गुजरातमध्ये २००२ पूर्वी २५० हून अधिक दंगली झाल्या होत्या. २००२ नंतर एकही दंगल झाली नाही. १९६९ ची दंगल तब्बल सहा महिने होती.'

२००२ गोध्रा हत्याकांड

२७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरातच्या गोध्रा स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ बोगीला आग लावण्यात आली. यात अयोध्येहून परत येणाऱ्या कारसेवकांचा मृत्यू झाला. यावरुन गुजरातमध्ये दंगली उसळल्या. या प्रकरणात एसआयटीच्या विशेष न्यायालयाने ३१ जणांना दोषी ठरवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT