
Crime News : एका डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. या तिघांनी क्लिनिकची तोडफोड केली, क्लिनिक संचालक डॉक्टरला मारहाण केली आणि प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर जबरदस्ती केल्याचा डॉक्टरवर आरोप आहे. यावरुनच डॉक्टरला मारहाण झाली असे म्हटले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवार १५ मार्च रोजी तिघे एका क्लिनिकमध्ये घुसले. त्यांनी तेथील क्लिनिक संचालक डॉक्टर धर्मेंद्रला मारहाण केली आणि त्याचा प्रायव्हेट पार्ट क्लिनिकमधील धारदार शस्त्राने कापला. या डॉक्टरने तिघांपैकी एका मारेकऱ्याच्या बायकोशी गैरव्यवहार केला होता. तो अवैध संबंधांसाठी महिलेवर दबाव टाकत होता.
काय आहे प्रकरण?
मारहाण प्रकरणी पोलिसांनी सतीश, विक्रम आणि विवेक यांना ताब्यात घेतले आहे. सतीश हा मेरठच्या परीक्षितगडमध्ये बायकोसोबत राहतो. विक्रम आणि विवेक हे त्यांच्या बायकोचे भाऊ आहेत. डॉक्टर धर्मेंद्र हा सतीशच्या बायकोला सारखा त्रास द्यायचा. सतीशच्या बायकोकडे धर्मेंद्रने शरीरसुखाची मागणी केली होती, अशी माहिती तिघांनी पोलिसांना दिली आहे.
एके दिवशी डॉक्टर धर्मेंद्रने सतीशच्या बायकोला बस स्टँडवर भेटायला बोलावले होते. धर्मेंद्रने अवैध संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली. याबाबत कळताच सतीशने दोन्ही मेहुण्यांसह धर्मेंद्रला मारहाण केली. डॉक्टर धर्मेंद्र महिलांशी छेडछाड करायचा. गैरव्यवहार केल्याने त्याला अनेक महिला वैतागल्या असल्याचा दावा तिघांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.